Jump to content

रंगीत लावा

निलगिरी पर्वतरांगातील नर रंगीत लावा

सिरसी लावा (इंग्लिश: northem painted bush quail) हा एक पक्षी आहे.

हा पक्षी मोठ्या लाव्या पेक्षा लहान असतो. नर वरून तपकिरी रंगाचा असतो. त्यावर पांढऱ्या रंगाच्या रेषा व काळ्या रंगाचे ठिपके असतात. कपाळापासून मानेच्या बाजुला पांढऱ्या रंगाची भुवईची ठळक पट्टी दिसते. मादीचा रंग वरून नरासारखाच असतो. डोके आणि गळा तांबूस असून गळ्यावर पांढरा डाग नसतो. भुवई वरची पट्टी नसते. पोटाखालचा रंग तांबूस आणि त्यावर चिन्हे.

वितरण

स्थानिक. पच्छिम बंगाल, ओरिसा

निवासस्थाने

पानगळ जंगलातील झुडपी भाग

संदर्भ

  • पक्षिकोश - मारुती चितमपल्ली