रँड पॉल
रॅंड पॉल Rand Paul | |
विद्यमान | |
पदग्रहण ३ जानेवारी, २०११ मिच मॅककॉनलच्या समेत | |
जन्म | ७ जानेवारी, १९६३ पिट्सबर्ग, पेनसिल्व्हेनिया |
---|---|
राष्ट्रीयत्व | अमेरिकन |
राजकीय पक्ष | रिपब्लिकन पक्ष |
वडील | रॉन पॉल |
सही |
रॅंड पॉल (इंग्लिश: Randal Howard Paul, ७ जानेवारी १९६३) हा एक अमेरिकन राजकारणी व विद्यमान सेनेटर आहे. २०११ सालापासून केंटकी राज्यातून सेनेटरपदावर असलेला पॉल माजी काँग्रेसमन रॉन पॉल ह्याचा मुलगा आहे. ड्यूक विद्यापीठातून वैद्यकीय शिक्षण घेतलेला पॉल पेशाने एक नेत्रशल्यचिकित्सक आहे.
एप्रिल २०१५ मध्ये पॉलने २०१६ मधील अध्यक्षीय निवडणुकीसाठी सालच्या रिपब्लिकन पक्षाच्या प्राथमिक निवडणुकांसाठी आपली उमेदवारी जाहीर केली. परंतु त्याला फारसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्याने उमेदवारी मागे घेतली. डॉनल्ड ट्रम्प हा रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार बनला.