Jump to content

योरो प्रांत

योरो हा होन्डुरासच्या अठरा प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत देशाच्या उत्तर-मध्य भागात आहे. अगुआन नदीच्या खोऱ्यात असलेल्या या प्रांतातील जमीन सुपीक आहे.

२०१५ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ५,८७,३७५ इतकी होती. या प्रांताची राजधानी योरो येथे आहे.

येथे अनेकदा मुसळधार पावसाबरोबर मासे आकाशातून पडतात.