योगिनी सातारकर
योगिनी सातारकर-पांडे (जन्म : १० एप्रिल, इ.स. १९८० - ) या मराठी कवयित्री आहेत. डायस्पोरिक व्हायसेस : अ स्टडी ऑफ सेल्फ, कल्चर ॲन्ड सोसायटी हा त्यांच्या शोधनिबंधाचा विषय होता.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड मध्ये त्या इ.स. २०१० सालापासून इंग्रजी विषयाच्या सहायक प्राध्यापक आहेत.
इंग्लिश ग्रंथ
इंडियन रायटर्स इन इंग्लिश : ए ट्रीटाईज
मराठी ग्रंथ
जाणिवांचे हिरवे कोंभ (कवितासंग्रह)
पुरस्कार
योगिनी सातारकर यांना एकूण बारा पुरस्कार मिळालेले आहेत.