योगिनी वेंगुर्लेकर
प्रा. योगिनी वेंगुर्लेकर ह्या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी अर्थशास्त्र या विषयाचे २५ वर्षे अध्यापन केले. ११वी, १२वीची कला आणि वाणिज्य शाखांची क्रमिक पुस्तके करण्यात त्यांचा सहभाग होता. राज्यस्तरीय पातळीवरील सेमिनारमध्ये त्यांनी पेपर-वाचन केले आहे.
योगिनी वेगुर्लेकर यांनी लिहिलेली पुस्तके
- कथा एका शर्यतीची : लोकशाहीवादी भारत आणि साम्यवादी चीन या दोन देशांनी केलेल्या वाटचालींचा आढावा
- कवडसे (कथासंग्रह, २००५)
- जाणता अजाणता (कादंबरी)
- डलांग (कथासंग्रह, २०१२)
- वास्तव (कथासंग्रह, २००२)
- सामाजिक चळवळी व सरकार (अनुवादित लेखसंग्रह, मूळ इंग्रजी लेखक : घनश्याम शहा) (यापूर्वीच्या ५० वर्षांतील सामाजिक चळवळींवर जे शोधनिबंध लिहिले गेले त्यांचे संकलन)
योगिनी वेगुर्लेकर यांना मिळालेले पुरस्कार
- 'वास्तव' कथासंग्रहाला २००२ सालचा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा शंकर पाटील पुरस्कार.
- याच कथासंग्रहाला २००३ साली पुणे नगर वाचन मंदिराचा श्री.ज. जोशी पुरस्कार, शिवाय त्याच वर्षी
- साहित्यप्रेंमी भगिनी-मंडळाकडून रा.भि. जोशी पुरस्कर.