Jump to content

योगाची मूलतत्त्वे (पुस्तक)

योगाची मूलतत्त्वे हे पुस्तक म्हणजे एलिमेंटस्‌ ऑफ योगा [] या श्रीअरविंद लिखित इंग्रजी मजकुराचा हा मराठी अनुवाद आहे. १९३३ ते १९३६ या कालावधीत एका साधकाने श्रीअरविंद यांना योगासंबंधी काही प्राथमिक स्वरूपाचे प्रश्न विचारले होते. त्या प्रश्नांना श्रीअरविंद यांनी पत्राद्वारे उत्तरे दिली होती. त्या पत्रांचे संकलन या पुस्तकात करण्यात आले आहे.

योगाची मूलतत्त्वे
लेखकश्रीअरविंद
मूळ शीर्षक (अन्य भाषेतील असल्यास)Elements of Yoga
अनुवादकभा.द.लिमये व विमल भिडे
भाषाइंग्रजी-मराठी
देशभारत
साहित्य प्रकारपत्रलेखन
प्रकाशन संस्थाश्रीअरविंद आश्रम, पॉण्डिचेरी
प्रथमावृत्ती१९८५
चालू आवृत्ती२००७
विषययोगासंबंधी मार्गदर्शन
पृष्ठसंख्या७३

पुस्तकातील आशय

  • पूर्णयोगाचे आचरण करण्यासाठी आवश्यक असणारे गुण - अभीप्सा, श्रद्धा, मन:पूर्वकता, समर्पण, अंतरात्म्याची उन्मुखता यांचे विवरण या पुस्तकामध्ये आहे.
  • तसेच आध्यात्मिक जीवन जगात असताना येणाऱ्या काही समस्या - अडचणी आणि प्रगती, कामवासना, आहार, निद्रा यांचे निराकरणदेखील या मध्ये करण्यात आले आहे.
  • योगमार्गाची हाक व पात्रता, साधनेचा पाया, अनुभव व दृष्टान्त, कर्म, रुपांतर, असे विविध विषय यामध्ये हाताळण्यात आले आहेत. []

येथे उपलब्ध

योगाची मूलतत्त्वे (online वाचनासाठी)


संदर्भ

  1. ^ Sri Aurobindo (1953). Elements of Yoga. Pondicherry: Sri Aurobindo Ashram.
  2. ^ योगाची मूलतत्त्वे, श्रीअरविंद आश्रम