Jump to content

येरमाळा

  ?येरमाळा

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरकळंब
जिल्हाधाराशिव जिल्हा
लोकसंख्या
घनता
५,४०४ (२०११)
त्रुटि: "४७.४%" अयोग्य अंक आहे/किमी
भाषामराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
• आरटीओ कोड

• एमएच/

येरमाळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक गाव आहे.धाराशिव जिल्हा येरमाळापासून तब्बल 36 किलोमीटर अंतरावर आहे आणि येडेश्वरी देवी मंदिर मात्र 4 किलोमीटर वर आहे. भाविकांचे हे मोठे श्रद्धास्थान मानले जाते.

येरमाळा मासे, खेकडे आणि इतर जलचर पालन व खाद्यासाठीही प्रसिद्ध आहे. येथे दर आठवड्याला भाजीपाला खरेदी-विक्रीसाठी मोठा बाजार भरतो आणि त्यातून शेतकरी आणि बाहेरील लोकांना चांगले उत्पन्न मिळते.

भौगोलिक स्थान

हवामान

येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ४९० मिलीमीटर असते.

लोकजीवन

प्रेक्षणीय स्थळे

येडेश्वरी मंदिर या ठिकाणी येरमाळा पासून चार किमी अंतरावर देवीचे हे मंदिर आहे. तुळजाभवानी देवीचा रूद्रावतार म्हणून या देवीला पाहिले जाते त्यामुळे तुळजापूर दर्शन करून येडेश्वरी दर्शनाकरता भाविक येतात . तुळजाभवानी देवीचे दर्शन झाल्यावर येडेश्वरीदेवीचे दर्शन घ्यावे लागते तरच देवीचे पुर्ण दर्शन होते अशी श्रद्धा आहे .

मंदिर उंच टेकडीवर स्थित असून मंदिरात देवीचा शेंदूराने लेपलेला पिंडी आकाराचा तांदळा आहे त्यावर चहू बाजूने नागवेलिच्या पानांचा वेढा देऊन

मधे डोळे व दात चिकटवलेले असल्याने देवी भयंकर दिसून येते.

मंदिराचे बांधकाम हेमाडपंती असून मंदिरावर वेगवेगळ्या देवतांच्या मुर्त्या दिसतात.जवळच मातंगीदेवीचेही स्थान आहे.

एके काळी येथे एक स्त्री वारंवार येत असे .या ठिकाणी कसलेही देवूळ नव्हते .ती स्त्री येथे येऊन पुजापाठ करत असे मात्र लोक तिला वेडी समजत .याच स्त्री च्या मुळे आज येडेश्वरी हे मंदिर टेकडीवर उभे आहे. देवीच्या प्रसादाचा मान त्या स्त्रीच्या वंशजांना आहे .

नागरी सुविधा

उपळाई

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate