Jump to content

यूरे काउंटी, कॉलोराडो

यूरे काउंटी /ˈjʊər/ ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील ६४ पैकी एक काउंटी आहे. २०२० च्या जनगणनेनुसारी येथील लोकसंख्या ४,८७४ होती.[] या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर यूरे येथे आहे. [] यूरे काउंटी पूर्णपणे पर्वतीय असून या काउंटीला अमेरिकेचे स्वित्झर्लंड असेही म्हणले जाते.

इतिहास

यूरे पासून लॉगहिल व्हिलेज कडे दिसत असलेले दृश्य

यूरे काउंटीची रचना १८ जानेवारी, १८७७ रोजी रोजी सान हुआन काउंटीमधून करण्यात आली. कॉलोराडोला राज्याचा दर्जा मिळाल्यावर तयार झालेली ही पहिली काउंटी होती. यूरे काउंटीला येथील चीफ यूरे या युट जमातीतील सरदाराचे नाव देण्यात आले आहे. १९ फेब्रुवारी, १८८१ रोजी युरे काउंटीमधून डोलोरेस काउंटीची स्थापना झाली. तर २७ फेब्रुवारी, १८८३ रोजी यातून सान मिगेल काउंटीची रचना करण्यात आले.

चतुःसीमा

बेर क्रीकवर पानखरीतील रंग

प्रमुख मार्ग

  • यूएस महामार्ग ५५०
  • कॉलोराडो राज्य महामार्ग ६२

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. September 5, 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.

गुणक: 38°10′N 107°46′W / 38.16°N 107.77°W / 38.16; -107.77