युवासेना
युवासेना ही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची युवा संघटना आहे.[१] महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यटन तथा पर्यावरण, वातावरणीय बदल व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे हे युवासेनेचे अध्यक्ष आहेत.[२]
युवासेना | |
Founded | १७ ऑक्टोबर २०१० |
---|---|
संस्थापक | आदित्य ठाकरे |
मुख्यालय | मुंबई |
सेवाकृत क्षेत्र | महाराष्ट्र |
पालक संघटना | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) |
संघटना
सन २०१० पासून म्हणजेच युवासेनेच्या स्थापनेपासून आदित्य ठाकरे हे युवासेनेचे अध्यक्ष आहेत. २०१० च्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत युवासेनेची स्थापना झाली.[३] आदित्य ठाकरेंच्या सक्रिय राजकारणाची सुरुवात युवासेनेच्या माध्यमातून सुरू झाली.
संदर्भ
- ^ "Yuva Sena stands for a movement, says Aaditya". 2015-10-17. ISSN 0013-0389.
- ^ "Aditya Thackeray to head youth wing of Sena". NDTV.com. 2024-06-12 रोजी पाहिले.
- ^ "Bal Thackeray launches his grandson into politics". 2010-10-18. ISSN 0013-0389.