Jump to content

युवंता

युवंता

लेखकडॉ. मोहन द्रविड
भाषामराठी
साहित्य प्रकारकादंबरी
प्रकाशन संस्थाफुलराणी प्रकाशन
प्रथमावृत्ती२००८
पृष्ठसंख्या१७३

युवंता (Juventas) ही ख्रिस्तपूर्व रोमन लोकांची यौवनाची देवता. प्राचीन काळी रोममध्ये पुरुषांनी तारुण्यात पदार्पण केलं की त्यांना यौवनाची दीक्षा दिली जात असे. त्यातील एका विधीत नवतरुण युवंताच्या मूर्तीसमोर सोन्याच्या नाण्यांची दक्षिणा ठेवून तिचा आशीर्वाद मागत. नववधू आपलं वैवाहिक जीवन सुखी व्हावं म्हणून लग्नात तिची पूजा करत. अशी ही यौवनाने मुसमुसलेली आणि लहानांपासून थोरांना यौवनाचं वरदान देणारी देवी युवंता.

ग्रीक पुराणात हिचे नाव आहे हेबी. देवांना अमृत पाजून चिरतरुण करणारी मोहिनी ती हीच. देव आणि दानवांच्या युद्धात हरक्युलिसने देवांना विजयी होण्यास मदत केली तेव्हा हेबीने त्याला अमृत पाजले आणि ती त्याच्याशी विवाहबद्ध झाली.

या कादंबरीची नायिका देवयानी ही निसर्गाचा असाच एक चमत्कार आहे. ती असाधारण सौंदर्य घेऊन जन्माला येते आणि काळाला दाद न देता ते टिकवून ठेवते. अनेक वर्षं सुखाचा संसार केल्यानंतरही आपलं जीवन अपूर्ण राहिलं, अशी चुटपूट या चिरतरुण रूपवतीला लागते आणि उतारवयात तिला पहिल्या प्रियकराची स्वप्नं पडायला सुरुवात होते. ती ज्या जागा तिच्या तरुणपणीच्या आठवणींशी निगडीत आहेत तिथे जाऊन भेट देते.