युयुत्सु
युयुत्सु हा धृतराष्ट्राचा पुत्र होता. हा गांधारीपुत्र नसून शंभर कौरवांतील एक गणला जात नाही. युयुत्सु हा धृतराष्ट्राचाच एक पुत्र होता. परंतु तो १०० कौरवांपैकी एक गणला जात नव्हता. अर्थात तो कौरवांचा सावत्र भाऊ होता. महाभारताच्या युद्धावेळी जेव्हा धर्मराज युधिष्ठिराने समस्त सैन्यास आवाहन केले की ज्यांना अजूनहि आपला पक्ष बदलावयाचा असेल ते आपला पक्ष बदलू शकतात. तेव्हा युयुत्सु ने आपला रथ पांडवांच्या शिबिरात नेला.अन तो युद्ध पांडवांच्या बाजूने लढला. कौरवांच्या पराजय अन् मृत्युनंतर जेव्हा युधिष्ठिर हस्तिनापुरचा राजा झाला तेव्हा हस्तिनापुरच्या आधिपत्याखाली असलेल्या इंद्रप्रस्थचा राज्यकारभार युयुत्सु कडे देण्यात आला. ३६ वर्षे राज्यकारभार बघितल्यानंतर जेव्हा पांडवांनी संन्यास घेतला तेव्हा हस्तिनापुरचा राज्यकारभार हा अभिमन्युचा पुत्र आणि अर्जुनचा नातू परिक्षित यास सोपवण्या आली आणि राज्यकारभारावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी युयुत्सुला देण्यात आली.