कॅलिफोर्निया विद्यापीठ (इंग्रजी University of California; संक्षेप: यूसी) ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील एक मोठी विद्यापीठ प्रणाली आहे. २०१५ साली कॅलिफोर्निया विद्यापीठाचे एकूण १० कॅम्पस राज्यभर पसरले आहेत व त्यांत एकूण २.३८ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इ.स. १८६८ साली बर्क्ली शहरामध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठाचा पहिला कॅम्पस स्थापन करण्यात आला. सध्या कॅलिफोर्निया विद्यापीठ ही जगातील आघाडीच्या विद्यापीठ प्रणाल्यांपैकी एक मानली जाते. कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या १० पैकी ७ कॅम्पस जगातील १०० सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांमध्ये आहेत. अमेरिकेतील सरकारी अनुदानावर चालणाऱ्या विद्यापीठांमध्ये यूसी बर्क्ली विद्यापीठ पहिल्या तर यूसी लॉस एंजेल्स कॅम्पस दुसऱ्या क्रमांकावर आहे.