युनिक फीचर्स
युनिक फीचर्स ही विविध वृत्तमाध्यमांना संपादकीय मजकूर पुरवणारी मराठीतील पहिली माध्यम संस्था आहे. सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी, संतोष कोल्हे, प्रसाद मिरासदार, राजेश्वरी देशपांडे, राजेंद्र साठे या मित्रांनी या संस्थेची उभारणी १९९१ साली केली. आनंद अवधानी हे या संस्थेचे कार्यकारी संचालक आहेत. ही संस्था विशिष्ट वृत्तमाध्यमांशी बांधील न रहाता, पत्रकारांना बातम्या आणि मजकूर पुरवणारे व्यासपीठ उपलब्ध करते. या संस्थेद्वारे समकालीन प्रकाशन ही ग्रंथप्रकाशन संस्था व अनुभव नावाचे एक मासिकही चालते.
युनिक फीचर्सच्या www.uniquefeatures.in या वेबसाईटवर ३० डिसेंबर २०१० ते ३ जानेवारी २०११ दरम्यान पहिल्या मराठी ई-साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.[१]
संदर्भ
- ^ "महाराष्ट्र टाइम्सच्या संकेतस्थळावरील वृत्त दिनांक ९ एप्रिल २०११ रोजी भाप्रवे सायं ७.३० वाजता जसे दिसले". 2011-01-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-04-09 रोजी पाहिले.