युकिहिरो मात्सुमोतो
युकीहीरो मात्सुमोतो まつもと ゆきひろ | |
---|---|
जन्म | युकीहीरो मात्सुमोतो ( 松本 行弘 ) १४ एप्रिल, १९६५ ओसाका प्रभाग, जपान |
राष्ट्रीयत्व | जपानी |
टोपणनावे | मात्झ |
पेशा | संगणक शास्त्रज्ञ, प्रोग्रामर, लेखक |
युकीहीरो मात्सुमोतो(まつもとゆきひろ ; १४ एप्रिल, १९६५ - ) तथा मात्झ हा एक जपानी संगणकशास्त्रज्ञ व सॉफ्टवेर प्रोग्रामर आहे. तो रुबी ह्या संगणकीय भाषेचा मुख्य योजक व कल्पक म्हणून व रुबीला चालविणारे सॉफ्टवेर मात्झचे रुबी इंटरप्रिटर ह्यांसाठी प्रसिद्ध आहे.
२०११ मध्ये मात्सुमोतो 'हिरोकू' ह्या ऑनलाईन क्लाउड संस्थेमध्ये रुबीचा मुख्य आर्किटेक्ट सान फ्रान्सिस्को येथे राहिला. तो 'राकुतेन इन्स्टीटूट ऑफ टेक्नोलॉजी', जे कि राकुतेन ह्या कंपनीची संशोधन संस्था आहे,चा सहकारी आहे. जून २०१४ मध्ये त्याला तांत्रिक सल्लागाराच्या भूमिकेवर वासिली ह्या कंपनीत नेमण्यात आले.[१]
सुरुवातीचे जीवन
मात्सुमोतोचा जन्म ओसाका ह्या भागात झाला असून, टो तोत्तोरी ह्या भागात वयाच्या चौथ्या वर्षानंतर मोठा झाला. 'जापान इंक.' ह्यांच्या मुलाखातीनुसार, तो मध्याशालेय शिक्षण संपेपर्यंत स्वशिक्षित प्रोग्रामर झाला होता.[२] तो सुकुबाच्या महाविद्यालायामधून माहिती विज्ञानामध्ये पदवीधर झाला. तिथे तो इकुओ नकाता ह्यांच्या संगणकीय भाषा व कमपायलर प्रयोगशाळेचा सदस्य होता.
कारकीर्द
तो 'नेटलाब डॉट जेपी' ह्या एका जापानी खुल्या स्रोत (ओपन सोर्स) कंपनीमध्ये काम करतो. तो जापानातील प्रसिद्ध खुल्या स्रोत सॉफ्तवेअर लेखक व शुभ्कार्त्यांपैकी एक आहे. त्याने अनेक खुले स्रोत प्रकल्प राबवले आहेत; जसे सीमेल व इमाक्स मधील मेल वापरकर्ता एजंट. रुबी हे त्याचे पहिले सॉफ्टवेर आहे जे जापानच्या बाहेर सुप्रसिद्ध झाले.[३] त्याच्या वर्तणूकीमुले रुबी विकासक समुदायामध्ये एक वाक्य प्रसिद्ध आहे: "मात्झ इज नाईस सो वी आर नाईस", म्हणजेच मात्झ छान आहे म्हणून आम्ही छान आहोत, ज्याला 'मिनास्वान' असे संक्षिप्त केल्या जाते.
रुबी
२१ डिसेंबर १९९५ला मात्झने रुबीची पहिली आवृत्ती सदर केली. एम. आर. आय ह्या रुबीच्या इंटरप्रीटरचा टो अजूनपर्यंत मुख्य विकासक आहे.[४][५]
एमरुबी
एप्रिल २०१२ मध्ये मात्झ्ने रुबीची एका खुली स्रोत अंमलबजावणी, 'एमरुबी' प्रकाशित केली.[६][७] 'राईट वीएम' ह्या त्याच्या आभासी संगणकयंत्र (व्हर्चुअल मशीन) वर एमरुबीचे एक किमान रूप आहे. तिचा उपयोग सॉफ्टवेर विकासकांना दुसऱ्या भाषांमध्ये रुबीचा स्रोत करण्यासाठी आहे. त्यासोबतच 'मेमरी फुटप्रिंट' लहान ठेवून एमरुबी प्रोग्रामला अनुकूल करण्यास मदत करते.
स्ट्रीम
डिसेंबर २०१४ मध्ये मात्झ्ने स्ट्रीम नावाच्या एका नव्या 'स्क्रिप्ट' आधारित संगणकीय भाषेचे अनावरण केले. स्ट्रीम ही एक सहकालिक (कोंकरंट) भाषा आहे ज्याची प्रेरणा लिनक्स शेल, एरलांग, इत्यादी अश्या फंक्शनल भाषांमधून घेतली गेलेली आहे.[८]
ट्रेझर देटा
ट्रेझर देटा ह्या कंपनीसाठी मात्झ्चे नाव एक गुंतवणूकदार म्हणून सूचीबद्ध झाले आहे. कंपनीचे अनेक प्रकल्प, जसे 'फ़्लुएन्टडी' हे रुबीचा वापर करतात.[९]
लेख साहित्य
- オブジェクト指向スクリプト言語 Ruby ISBN 4-756-13254-5
- Ruby in a Nutshell ISBN 0-596-00214-9
- The Ruby Programming Language ISBN 0-596-51617-7
मान्यता व पुरस्कार
- २०११ मध्ये मात्झला 'मुक्त सोफ्टवेअर मधील प्रगती' साठी पुरस्कार, मुक्त सोफ्टवेअर संघाद्वारे देण्यात आले.[१०]
वयक्तिक जीवन
मात्झ हा विवाहित आहे व त्याला ४ मुले आहेत. तो 'दि चर्च ऑफ जीसस ख्रिस्त ऑफ लेटर डे सेंट्स' ह्या दलाचा सदस्य आहे. त्यांने पूर्वी एक धर्माप्रचार्तर म्हणून काम केले व तो आता बिशाप्चालाकामध्ये सल्लागार म्हणून कार्य करतो.[११]
संदर्भ
- ^ [१] Archived 2014-06-29 at the Wayback Machine. : Press realease Vasily"PRESSRELEASE - 株式会社VASILY(ヴァシリー)". vasily.jp. 2014-06-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-11-26 रोजी पाहिले.
- ^ [२] : The man who gave us ruby
- ^ [३]: Yukihiro Matsumoto : oreilly.com
- ^ [४] Archived 2015-11-06 at the Wayback Machine.: More Archeolinguistics: Unearthing proto Ruby
- ^ [५] Archived 2011-07-16 at the Wayback Machine. History of Ruby
- ^ [६] mRuby : Lightweight ruby
- ^ [७]: mruby and Mobiruby : Matt Aimonetti
- ^ [८]: Streem on github.com
- ^ [९] : Company : Treasure data
- ^ [१०]: 2011 free software awards announced
- ^ [११] Archived 2017-11-09 at the Wayback Machine.: Colloquim : Yukihiro Matsumoto
बाह्य दुर्वा
- Matz's web diary (and translated to English with Google Translate) (in Japanese)
- Ruby Design Principles talk from IT Conversations
- The Ruby Programming Language – An introduction to the language by its own author
- Treating Code as an Essay – Matz's writeup for the book Beautiful Code, edited by Andy Oram, Greg Wilson, O'Reilly, 2007. ISBN 0-596-51004-7 ISBN : 9780596510046