यांगशान बंदर
यांगशान बंदर हे चीनमधील शांघाय शहराच्या दक्षिणेला कंटेनर जहाजांमधील मालाची चढउतार करण्यासाठी खोल समुद्रात बांधण्यात आलेल बंदर आहे. हे बंदर चीनच्या मुख्य भूमीशी ३२.५ कि. मी. लांबीच्या डोंघाय पुलाने जोडण्यात आले आहे. १ डिसेंबर २००५ला डोंघाय पुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला व हा पूल समुद्रावर बांधण्यात आलेला जगातला सर्वात लांब पूल आहे. हा सहापदरी पूल बांधण्यासाठी ६००० कामगार आणि २.५ वर्ष लागली.
बांधकामाचे टप्पे
२००१ साली ४ पैकी पहिल्या टप्प्याच्या कामाला सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला.