Jump to content

यष्टिरक्षक

यष्टिरक्षक

यष्टिरक्षक हा क्रिकेट खेळामधील एक खेळाडू आहे जो त्याचा संघ क्षेत्ररक्षण करीत असताना स्टंप्सच्या मागे उभा राहतो. जर द्रुतगती गोलंदाजी चालू असेल तर यष्टीरक्षक यष्ट्यांपासून लांब उभा राहतो व फिरकी गोलंदाजी चालू असताना यष्ट्यांच्या जवळ उभा राहतो. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये केवळ यष्टीरक्षकालाच हातमोजे (ग्लोव्ह्ज) व पायांना पॅड्स बांधायची परवानगी आहे. यष्टिरक्षकाची कर्तव्ये खालीलप्रमाणे:

  • फलंदाजाच्या बॅटचा कडा घेऊन आलेले चेंडू झेलणे.
  • फलंदाज आपल्या क्रीझच्या बाहेर पडला असेल त्याला यष्टिचीत करण्याचा प्रयत्‍ना करणे.
  • क्षेत्ररक्षकाने फेकलेला चेंडू पकडून धावा घेत असलेल्या फलंदाजांना धावचीत करण्याचा प्रयत्‍न करणे.

क्रिकेटच्या नियमांनुसार सामन्यादरम्यान यष्टीरक्षक जखमी अथवा जायबंदी झाल्यास बदली यष्टिरक्षकाला बोलावता येत नाही. क्षेत्ररक्षण करणाऱ्या इतर १० खेळाडूंपैकी एकालाच हे काम सांभाळावे लागते.

सर्वात यशस्वी यष्टिरक्षक

कसोटी क्रिकेट

क्रम नाव देश सामने झेल यष्टिचीत एकूण बळी
1मार्क बाउचरदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका14753223555
2ॲडम गिलख्रिस्टऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया9637937416
3इयन हिलीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया11936629395
4रॉडनी मार्शऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया9634312355
5महेंद्रसिंह धोनीभारतचा ध्वज भारत9025638294
6जेफ दुजॉंवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज812655270
7ॲलन नॉटइंग्लंडचा ध्वज इंग्लंड9525019269
8मॅट प्रायरइंग्लंडचा ध्वज इंग्लंड7924313256
9ॲलेक स्टुअर्टइंग्लंडचा ध्वज इंग्लंड13322714241
10वसिम बारीपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान8120127228

टीपा

  1. ३१ डिसेंबर २०१४ अखेर
  2. विद्यमान खेळाडू

एकदिवसीय क्रिकेट

क्रम नाव देश सामने झेल यष्टिचीत एकूण बळी
1कुमार संघकारा 2श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका40438399482
2ॲडम गिलख्रिस्टऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया28741755472
3मार्क बाउचरदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका29540222424
4महेंद्रसिंह धोनी 2भारतचा ध्वज भारत26124485329
5मोइन खानपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान21921473287
6ब्रेंडन मॅककुलम2न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड24822715242
7इयन हिलीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया16819439233
8रशीद लतीफपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान16618238220
9रोमेश कालुवितरणाश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका18913175206
10जेफ दुजॉंवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज16918321204

टीपा

  1. ३० जानेवारी २०१५ अखेर
  2. विद्यमान खेळाडू