यशोधरा श्रीनिवास साठे
यशोधरा पोतदार-साठे या एक मराठी कवयित्री आहेत. [ जन्म : १३ मार्च १९५१ ]
यशोधरा पोतदार यांची पुस्तके
- तनमनाची गाणी (पहिला कवितासंग्रह)
- मनाचिये गुंफी (कवितासंग्रह)
कौटुंबिक माहिती
यशोधरा या कवयित्री डॉ. अनुराधा पोतदार यांच्या कन्या , वि .द.घाटे यांची नात आणि दत्त (कवी) यांच्या पणती लागतात. यशोधराबाईंच्या आई कविता करत आणि भाऊ प्रियदर्शन पोतदार हेही कवी आहेत. यशोधरा पोतदार यांचे पती श्रीनिवास साठे लेखक आहेत आणि सासूबाई सुधा साठे ( - २२ जुलै २०००) याही लेखिका होत्या. नाटककार शं.गो. साठे हे त्यांचे सासरे होत.
पुरस्कार
- ’तनमनाची गाणी’ला महाराष्ट्र राज्य पुरस्कार, आणि ’इंदिरा संत’ पुरस्कार मिळाले आहेत.