Jump to content

यशवंतराव स्वामी साधू देव मामलेदार

श्रीगुरू सिद्धपादाचार्य स्वामी उर्फ देव मामलेदार.jpg

II सिद्धपादाचार्य स्वामी उर्फ यशवंतराव महाराज साधू देव मामलेदार II

कलियुगाचे औतारस्थित श्रीमत सदगुरू पद्मनाभाचार्य स्वामी महाराजांनि श्री जातवेद महा वाक्यांग ग्रंथात वर्णन केलेले स्वामींचे चरित्र थोडक्यात संक्षिप्त रूपात . श्रीगुरू सिद्धपादाचार्य स्वामी हे महाराष्ट्रातील थोर संत आणि कलियुगाचे औतारस्थित श्रीमत सदगुरू पद्मनाभाचार्य स्वामी महाराजांचे गुरू होते . श्रीगुरू सिद्धपादाचार्य स्वामी हे गुरुवर्य ब्राह्मणापैकी श्री प्रवरी,कश्यप गोत्री,अश्वलायनी शाखेचे,ऋग्वेदीय देशस्थ ब्राह्मण होते.त्यांचे मूळ नाव श्री यशवंत महादेव कुलकर्णी होते आणि गुरुगृहीचे नाव सिद्धपादाचार्य स्वामी असे होते.स्वामी हे ऋग्वेदी ब्राह्मण असले तरी त्यांना सरकार दरबारी न्यायासन प्राप्त होते.तिथे स्वामी न्यायदानाचे काम करीत त्यांना मामलेदार हे पद प्राप्त होते.त्यांच्या अलौकिक लीला आणि त्यांच्यातील देवपण यामुळे लोक स्वामींना साधू देव मामलेदार असे संबोधत असत.स्वामींचा जन्म शालिवाहन शके १७३७ साली भाद्रपद मासी शुल्क पक्षी नवमी तिथीस गुरुवारी सूर्योदय समयी पुण्यातील ओंकार वाड्यात झाला.श्रीगुरू स्वामी हे दत्त गुरूंचे उपासक होते मुखी नामाचा अखंड जप चालू असायचा त्यात जराही खंड पडत नसे.

स्वामीच्या लीला वर्णिताना पद्मनाभ स्वामी म्हणतात,

II श्री उर्वाच्य II अभंग विषम चरणी II

निपुत्रिका पुत्र I निर्धनासी धन I चिरंजीव जाण I मज केले II

याचकांसी तृप्त I स्वपत्नीचे दान I अज्ञाना सज्ञाना I केले जणे II

राजकीय धन I राजा ज्ञे वांचून I ब्राह्मणासी दान I ज्याने दिले II

योग्यचि हिशोब I साहेबा दाविला I अर्धा आणा दिल्हा I वाढ जेणे II

नवसा पावणे I पाखांड्याचा छळ I करी घननिळ I जयासाठी II

मांसाची मालिका I पुष्पवत केली I गळ्यात घातली I पाखांड्याच्या II

मार्गाने चालतां I मांस पूर्ववत I दाविले गळ्यांत I पाखांड्यासी II

छीथू सर्व ज्यनी करोनी पाखांड्या I म्हणाले कां वेड्या I केला छळ II

हजारो रुपये I कर्जाव काढून I याचकासी दान I ज्याणे दिले II

मेलेला बालक I ज्याणे उठविला I त्या स्वामींची लीला I वाणू काय II

सत्र्या पाटलाचे I पांचशे रुपये I घेवोनिया स्वयें I दान केले II

धुळ्यात मालेगावीI जातां पाठवीन I दिधले वचन I पाटलासी II

परी विसरले I आठवण नाहीI ईशे लवलाही I फेडियले II

पद्मा म्हणे ईशे I भैयाजी होऊनI स्वामींचे वचन I पूर्ण केले II

नवसा पावले I सत्य तें वच्यन I असत्य भाषण I मुळी नाही II

अजुनी पावतीI करिता नवस I परी भाव त्यास I समर्पिता II

पद्मनाभ म्हणे I गुरू यशवंता I नवस बहुतां I लोकी केले II


स्वामींचे गुरू

श्रीगुरू निर्मळाचार्य स्वामी जे शृंगेरी मठाचे गुरू होते त्या श्री गुरू निर्मळाचार्य स्वामींनी नृसिंह सरस्वती(गाणंगापूर),कमळाकर स्वामी आणि यशवंतराव स्वामी या तिघांनाच सदगुरू दीक्षा दिली होती .


स्वामींचे शिष्य

कलियुगाचा सद्गुरु

स्वामींचे एकंदर तीनच शिष्य होते

सदानंद स्वामी - काशी क्षेत्र

नारायण स्वामी - गोदातीर

पद्मनाभ स्वामी - कलियुगाचा औतारस्थित सदगुरू

शालिवाहन सन १८०९ मार्गशीर्ष मासी कृष्ण एकादशीस रविवारी प्रातः काळी श्रीगुरू स्वामीनी आपला देह पंच तत्त्वांत विलीन केला. नाशकांत गोदावरी तीरी रामकुंडा पाशी स्वामींची समाधी छत्री असून तेथे सुंदर असे मंदिर उभारले आहे.आणि त्याची नित्य पूजा अर्चा योग्य चालण्यासाठी महाजन दातेंनी योग्य तजवीज केली आहे.