Jump to content

यशवंतबुवा महाले

यशवंतबुवा महाले
आयुष्य
जन्म १६ जून, १९३५
जन्म स्थान मुंबई
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
संगीत साधना
गायन प्रकार गायन
घराणे आग्रा घराणे
संगीत कारकीर्द
पेशा गायकी

यशवंतबुवा महाले (जन्मदिनांक १६ जून, १९३५ - हयात) हे लोकप्रिय आग्रा घराण्याचे हिंदुस्तानी गायक आहेत.

पूर्वायुष्य

पूर्व जीवन-  यशवंत  मधुसूदन महाले यांचा जन्म मुंबईमध्ये  १६ जून, १९३५  ला झाला. त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झाले.  १९५५ साली त्यांनी ओरिएंटल  लाइफ इन्शुरन्स कंपनी मध्ये असिस्टंट म्हणून नोकरी स्वीकारली.  १९५६ मध्ये लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन स्थापन झाल्यावर त्यांची लखनऊ येथे बदली झाली. चाळीस वर्षे एलआयसी मध्ये विविध जबाबदाऱ्यांच्या पदांवर काम करून १९९५ मध्ये ते चीफ प्रोटोकॉल ऑफिसर (प्रमुख शिष्टाचार अधिकारी) अशा संवेदनशील पदावरून निवृत्त झाले.


सांगीतिक शिक्षण- १९६३ साली त्यांनी भातखंडे संगीत विद्यापीठ, लखनौ मधून मास्टर ऑफ म्युझिक ही पदवी प्राप्त केली. सुरुवातीला पंडित विनायकराव लेले व पंडित गोविंद नारायण नातू यांचेकडे ख्याल गायकीचे व नंतर उस्ताद  रहीमुद्दिन खाँ यांचेकडे ध्रुपद धमार गायकीचे शिक्षण घेतले. ख्याल व ध्रुपद धमार गायकीचे प्रगत शिक्षण त्यांनी १४ वर्षे   गुरू-शिष्य परंपरेने आचार्य श्री ना रातंजनकर यांचेकडे घेतले. त्यांच्या निधनानंतर पंडित के जी गिंडे यांचे १९७४ ते १९९४ असे दीर्घकाळ त्यांना मार्गदर्शन मिळाले.

सांगीतिक कारकीर्द

१) जवळ जवळ २५ वर्षे अनेक गायक गायिकांना परीक्षांसाठी व कार्यक्रम सादरीकरणामध्ये मार्गदर्शन;

 २) मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी अभ्यागत प्राध्यापक;

३) भातखंडे संगीत विद्यापीठ व इतर विद्यापीठात संगीत प्रवीण व डॉक्टरेट साठी परीक्षक;

४) सेन्टर फॉर कल्चरल रिसोर्सेस अँड ट्रेनिंग यांच्या परीक्षक मंडळामध्ये २३ वर्षे सहभाग;

५) विद्यापीठांमध्ये तसेच संगीत महाविद्यालयांमध्ये गायनाचे व लेक्चर डेमॉन्स्ट्रेशनचे कार्यक्रम;

६) आचार्य रातंजनकर फाउंडेशन, मुंबई चे २० वर्षे ट्रस्टी;

७) आकाशवाणी मुंबई साठी स्थानिक ऑडिशन समिती तसेच शास्त्रीय संगीताला वाहिलेल्या अनेक कार्यक्रमांची निर्मिती    

    व मुलाखतींमध्ये सहभाग.


भातखंडे संगीत परंपरेचे जतन व संवर्धन-

१) आचार्य रातंजनकर यांनी देशभरातील, विविध मासिकात लिहिलेल्या १२६ लेख, व केलेल्या भाषणांचे संपादन करून “Aesthetic Aspects of India’s Musical Heritage” या पुस्तकाचे प्रकाशन (१९९२);

२) आचार्य रातंजनकर यांनी “चतुर्दंडी प्रकाशिका” या पंडित व्यंकटमखी यांच्या ग्रंथाच्या केलेल्या हिंदी भाषांतराच्या पुस्तकाचे प्रकाशन (२०१५);

३) आचार्य रातंजनकर यांनी महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथ निर्मिती यांचेसाठी लिहिलेल्या व श्रीरंग संगोराम यांनी हिंदीमध्ये भाषांतरित केलेल्या - “संगीत परिभाषा विवेचन ” या पुस्तकाचे प्रकाशन (२०००);

४) पंडित के जी  गिंडे यांनी रचलेल्या बंदिशींचे नोटेशन सह “सुजनसुतमंजिरी” या पुस्तकाचे व सीडीचे प्रकाशन (२०१४);

५) “ गीत समूह ” या पंडित गोविंद नारायण नातू  यांच्या बंदिशीच्या पुस्तकांचे व सीडीचे प्रकाशन (२०१५);                   ६) आचार्य रातंजनकर यांनी रचलेल्या ५१४ बंदिशींच्या “ अभिनव गीत मंजिरी ” या तीन भागात असलेल्या पुस्तकांच्या नवीन आवृत्तीचे व पंडित के जी गिंडे व यशवंत महाले यांनी गायिलेल्या सीडी चे प्रकाशन (२०१६);

७) “ आग्रा घराना- परंपरा और बंदिशे “ ह्या आग्रा घराण्याच्या पारंपरिक १४८ बंदिशी असलेल्या पुस्तकाचे नोटेशन व सीडी सहित प्रकाशन (२०१९);                                                                                          

८) “ रागांग राग  विवेचन “ ह्या पंडित के जी गिंडे  यांच्या  ३८ सप्रयोग व्याख्यानांचे सुलभ स्पष्टीकरण करणारे पुस्तक प्रसिद्ध केले (२०१९);

९) “सुजन दास” या नावाने शब्द व स्वरबद्ध केलेल्या १४० बंदिशींचे नोटेशन व सीडी सहित “ यश संगीतामृत ” या पुस्तकाचे प्रकाशन (२०१०/२०१४)

१०) “साप्ताहिक विवेक” ने प्रसिद्ध केलेल्या  “आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण - शिल्पकार चरित्रकोश”   या ग्रंथासाठी संगीत क्षेत्रातील बुजुर्गांची चरित्रे लिहिली (२०१७);

११) संगीत रिसर्च अकॅडमी, कलकत्ता यांचे साठी व इतर अनेक मासिके व समारोहांसाठी संगीत विषयावर विस्तृत लेखन.

पुरस्कार व सन्मान

“स्वरसाधना रत्न” पुरस्कार (२००७); “जीवन गौरव” पुरस्कार दादर-माटुंगा कल्चरल सेंटर (२०१३);   स्वरव्रती  पुरस्कार (अल्लादियाखाँ ट्रस्ट) (२०१५); पंडित जानोरीकर संगीत भूषण पुरस्कार (२०१५) ; “स्वामी वल्लभदास सन्मान पुरस्कार” (२०१८); मुंबई युनिव्हर्सिटीच्या संगीत विभागाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त विशेष पुरस्कार (२०१९-२०२०).