यशवंतगड (रेडी)
यशवंतगड (रेडी) | |
यशवंतगड (रेडी) | |
नाव | यशवंतगड (रेडी) |
उंची | |
प्रकार | गिरिदुर्ग |
चढाईची श्रेणी | सोपी |
ठिकाण | रेडी |
जवळचे गाव | वेंगुर्ला |
डोंगररांग | |
सध्याची अवस्था | फारशी चांगली नाही |
स्थापना | {{{स्थापना}}} |
यशवंतगड (रेडी) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी गावातील एक किल्ला आहे.
भौगोलिक स्थान आणि किल्ल्याची माहिती
यशवंतगड (रेडी) किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. या गडाची जागा खाडीच्या मुखावर असलेल्या टेकडीवर आहे. गडाला मजबूत तटबंदी असून बुरुजही बांधलेले आहेत. तटदरवाज्यातून प्रवेश केल्यावर बालेकिल्याकडे जाणारी पाखाडी लागते. तेथून पुढे एक तटबंदी पार केल्यावर बालेकिल्ला लागतो. बालेकिल्ल्याला २५ फुट उंचीचा तट आहे. तटावर बाहेरून चढायला अवघड जावे यासाठी आग्नेय दिशा सोडून सर्व बाजूंनी खंदक खणलेले आहेत. किल्ल्यात पडक्या वाड्याचे अवशेष राहिले आहेत. या वाड्याला अनेक झाडांनी वेढलेले आहे. पण पाण्याचा साठा कुठेच सापडत नाही.
इतिहास
या किल्ल्याचा इतिहास सध्या माहित नाही.
छायाचित्रे
- यशवंतगड (रेडी) किल्ल्याला जोडलेला समुद्र किनारा
- यशवंतगड (रेडी) मधील वाड्यांचे अवशेष
- यशवंतगड (रेडी) मधील वाड्यांची सद्यस्थिती
- यशवंतगड (रेडी) मधील वाड्यांची सद्यस्थिती
- यशवंतगड (रेडी) जवळील सापडलेला ६ फुट उंचीचा बसलेला गणपती
कसे जाल
वेन्गुर्ल्यामार्गे शिरोडा बोटीतून ओलांडून रेडीमध्ये पोहोचले की हा किल्ला आहे.
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे
पडके वाडे आणि भक्कम तटबंदी
गडावरील राहायची सोय
नाही
गडावरील खाण्याची सोय
नाही
गडावरील पाण्याची सोय
नाही
संदर्भ
- सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो
- डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
- दुर्गदर्शन - गो. नी. दांडेकर
- किल्ले - गो. नी. दांडेकर
- दुर्गभ्रमणगाथा - गो. नी. दांडेकर
- ट्रेक द सह्याद्रीज (इंग्लिश) - हरीश कापडिया
- सह्याद्री - स. आ. जोगळेकर
- दुर्गकथा - निनाद बेडेकर
- दुर्गवैभव - निनाद बेडेकर
- इतिहास दुर्गांचा - निनाद बेडेकर
- महाराष्ट्रातील दुर्ग - निनाद बेडेकर
हे सुद्धा पहा
भारतातील किल्ले