म्हैस (कथा)
म्हैस ही पु. ल. देशपांडे ह्यांनी लिहिलेली एक विनोदी काल्पनिक कथा आहे. रत्नागिरीहून मुंबईला चाललेल्या एका एस.टी. बससमोर एक म्हैस आडवी येते व त्यानंतरच्या झालेल्या एकूण गोंधळाचे वर्णन ह्या कथेत केलेले आहे. पु.लं.नी ह्या कथेमध्ये कोकणातील विचारसरणी, वागणूक इत्यादी बाबींचे चित्रण बारकाईने टिपले आहे. या कथेवर मराठीत एक चित्रपट होत आहे. (२-४-२०१३ची बातमी)
प्रमुख पात्रे
- ड्रायव्हर: शिवराम गोविंद
- म्हशीचा मालकः धर्मा मांडवकर
- पुढारी: बाबासाहेब मोरे
- झंप्या दामले
- बघुनाना
- मधू मालुष्टे
- सुबक ठेंगणी
- उस्मानशेट
- गावकरी
- डॉक्टर, शाळामास्तर, ऑर्डर्ली
- आणि म्हैस.