म्हसदी
म्हसदी महाराष्ट्रातील साक्री तालुक्यात असलेले गाव आहे.
ग्रामदैवत
कुलस्वामिनी श्री धनदाई माता' ५१ पेक्षा अधिक कुळांची कुलदेवता असणाऱ्या साक्री तालुक्यातील म्हसदी गावालगत दीड किलोमीटर अंतरावर धनदाई मातेचे मंदिर वसले आहे . सातपुडा परिसरातील जनतेवर दैत्य अत्याचार करू लागले , त्यांच्या अत्याचारापासून रक्षण करण्यासाठी जनतेने आदिशक्तीची प्रार्थना केली . भक्तांच्या प्रार्थनेला प्रसन्न होऊन धनदाई , सप्तशृंगी , म्हाळसा , एकविरा , चिराई , भाटायी ,रेणुका अशा सप्तर्षी भगिनींच्या रूपाने आदिशक्ती खानदेशात अवतरली . या सप्त भगिनींनी दैत्यांना युद्धाचे आवाहन दिले . दैत्य पराभूत झाले . वेगवेगळ्या दिशेने पळत सुटले . रेड्याचे रूप घेऊन ठिकठिकाणी जंगला मध्ये लपून बसले . तेव्हा या साप्तभगिनी त्यांचा पाठलाग करत त्या जंगलात पोहचल्या व रेड्यांच्या रूपात असलेल्या दैत्यांचा नाश केला.[१]
श्री धनदाई माता खालील कुळांचे कुलदैवत आहे.
- पाटील/पट्टराजा (क्षत्रिय पदवी)
- देशमुख/देशपाटील (क्षत्रिय पदवी)
- कुळकर्णी (ब्राह्मण पदवी)
- देशपांडे (ब्राह्मण पदवी)
- जोशी (ब्राह्मण पदवी)
- पंत (ब्राह्मण पदवी)
- महाजन (वैश्य पदवी)
- शिंदे/सिंधिया
- देवरे
- शेवाळे
- खैरनार
- काळे
- वाघ
- देसले
- बेडसे
- भुसे
- बेंडाळे
- रौंदळ
- गायकवाड
- कुवर
- नेरपगार
- नेरकर
- खैरे
- राजपूत
- शितोले
- धोंडगे
- पवार
- सूर्यवंशी
- केदार
- खराटे
- गांगुर्डे
- साळी
- धोंगडे
- कडभाने
- जांद्रे
- शंकपाळ
- विश्वास
- माळी
- गिरासे
- व्यवहारे
- डबे
- तुपे
- अमराळे
- महाले
- चव्हाण
- छिंपी (शिंपी) bagul
संदर्भ आणि नोंदी
- ^ "श्री धनदाई देवीची महती | Dhandai Devi Mandir, Mhasdi". dhandaidevi.org. 2020-10-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-12-26 रोजी पाहिले.