म्यिटक्यिना
म्यिटक्यिना ही म्यानमार देशाच्या काचीन राज्याची राजधानी आहे. म्यिटक्यिना यांगोन आणि मंडाले या महत्त्वाच्या शहरांपासून अनुक्रमे १४८० कि.मी. आणि ७८५ कि.मी. इतक्या अंतरावर आहे. इरावती नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले हे शहर म्यानमारमधील सर्वात उत्तरेकडील बंदर तसेच रेल्वे टर्मिनस आहे.
इतिहास
प्राचीन काळापासून म्यिटक्यिना हे चीन व ब्रह्मदेश यांच्यातील व्यापारासाठी महत्त्वाचे ठिकाण राहिले आहे.
१९४२ मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान जपानी लष्कराने शहरावर नियंत्रण मिळवले.१९४४ मध्ये मित्रराष्ट्रांनी जपानी सैन्याला हरवून पुन्हा शहर काबीज. लेडो मार्गावर असल्यामुळे म्यिटक्यिना शहराला त्यावेळेस अनन्यसाधारण महत्त्व होते.
समाजव्यवस्था
काचीन राज्याची राजधानी म्हणून म्यिटक्यिना राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. लोकसंख्या सुमारे १,५०,००० आहे. काचीन व बर्मी भाषा इथे बोलली जाते.
बाह्य दुवे
- इंग्रजी विकिपीडिया (इंग्लिश मजकूर)