Jump to content

मौसमी चॅटर्जी

Moushumi Chatterjee (es); Moushumi Chatterjee (hu); મૌસમી ચેટર્જી (gu); موشمی چٹرجی (ks); Moushumi Chatterjee (ast); موشومی چاترجی (azb); मौसमी चटर्जी (mai); Moushumi Chatterjee (ga); موشومی چاترجی (fa); Moushumi Chatterjee (da); मौसमी चटर्जी (ne); موشمی چٹرجی (ur); Moushumi Chatterjee (tet); Moushumi Chatterjee (sv); Moushumi Chatterjee (ace); मौसमी चटर्जी (hi); మౌసమీ ఛటర్జీ (te); Moushumi Chatterjee (fi); মৌচুমী চেটাৰ্জী (as); Moushumi Chatterjee (map-bms); மௌசமி சட்டர்ஜீ (ta); मौसमी चटर्जी (bho); মৌসুমী চট্টোপাধ্যায় (bn); Moushumi Chatterjee (fr); Moushumi Chatterjee (jv); മൌഷുമി ചാറ്റർജി (ml); Moushumi Chatterjee (de); モウシュミ・チャテルジー (ja); मौसमी चॅटर्जी (mr); Moushumi Chatterjee (it); ମୌସୁମୀ ଚାଟାର୍ଜୀ (or); Моушуми Чаттерджи (ru); Moushumi Chatterjee (pt); Moushumi Chatterjee (bjn); Moushumi Chatterjee (ca); Moushumi Chatterjee (sl); Moushumi Chatterjee (min); Moushumi Chatterjee (pt-br); Moushumi Chatterjee (nl); Moushumi Chatterjee (id); Moushumi Chatterjee (nn); Moushumi Chatterjee (nb); Moushumi Chatterjee (su); Moushumi Chatterjee (bug); Moushumi Chatterjee (gor); ಮೌಶೂಮಿ ಚಟರ್ಜಿ (kn); موشومى تشاترجى (arz); Moushumi Chatterjee (en); موشومي تشاترجي (ar); ਮੋਸ਼ੂਮੀ ਚੈਟਰਜੀ (pa); Moushumi Chatterjee (uz) actriz india (es); ભારતીય અભિનેત્રી (gu); aktore indiarra (eu); ہِندوستٲنؠ فِلِمی اَداکارہ (ks); actriz india (ast); индийская актриса (ru); actores a aned yn 1948 (cy); ban-aisteoir Indiach (ga); بازیگر هندی (fa); 印度女演員 (zh); indisk skuespiller (da); actriță indiană (ro); indisk skådespelare (sv); שחקנית הודית (he); भारतीय अभिनेत्री (hi); intialainen näyttelijä (fi); ভাৰতীয় অভিনেত্ৰী, ৰাজনীতিবিদ (as); Indian actress (en-ca); இந்திய திரைப்பட நடிகை (ta); attrice indiana (it); ভারতীয় অভিনেত্রী (bn); actrice indienne (fr); India näitleja (et); އިންޑިއާއަށް އުފަން އެކްޓްރެސެއް (dv); Indian actress (en); actriz indiana (pt); Indian actress (en); pemeran asal India (id); indisk skodespelar (nn); indisk skuespiller (nb); Indiaas actrice (nl); ഇന്ത്യന്‍ ചലചിത്ര അഭിനേത്രി (ml); ଭାରତୀୟ ଅଭିନେତ୍ରୀ (or); Indian actress (en-gb); індійська акторка (uk); actriz india (gl); ممثلة هندية (ar); actriu índia (ca); indische Schauspielerin (de) ମୌସୁମୀ ଚାଟର୍ଜୀ (or)
मौसमी चॅटर्जी 
Indian actress
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
स्थानिक भाषेतील नावমৌসুমী চট্টোপাধ্যায়
जन्म तारीखएप्रिल २६, इ.स. १९५३, एप्रिल २६, इ.स. १९४८
कोलकाता
नागरिकत्व
निवासस्थान
व्यवसाय
मातृभाषा
अपत्य
  • Megha Mukherjee
  • Payal Mukherjee
वैवाहिक जोडीदार
  • Jayant Mukherjee
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

मौसमी चॅटर्जी (जन्म इंदिरा चट्टोपाध्याय ; २६ एप्रिल १९५२) ह्या एक भारतीय अभिनेत्री आहे ज्या हिंदी चित्रपटसृष्टी तसेच बंगाली चित्रपटांमध्ये त्यांच्या कामासाठी ओळखल्या जातात. १९७० च्या दशकात त्या हिंदी चित्रपटांमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यांनी २०१९ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

प्रारंभिक आणि वैयक्तिक जीवन

चॅटर्जी यांचा जन्म कोलकाता येथे एका बंगाली ब्राह्मण कुटुंबात झाला जो अविभक्त बंगालमधील बिक्रमपूर येथील होता. त्यांचे वडील प्रणतोष चट्टोपाध्याय हे भारतीय सैन्यात होते आणि आजोबा न्यायाधीश होते. त्याँचे खरे नाव इंदिरा आहे आणि मौसमी हे तिचे स्क्रीन-नाव आहे.[]

तरुण वयात, इंदिरा चट्टोपाध्याय यांचा विवाह त्यांच्याच समाजातील आणि तत्सम कौटुंबिक पार्श्वभूमीतील गृहस्थ जयंता मुखर्जी यांच्याशी बंगाली पद्धतीने झाला. जोडप्याला दोन मुली आहेत. त्यांचे पती जयंता मुखर्जी हे संगीतकार आणि गायक हेमंत कुमार यांचे पुत्र आहेत. जयंता हे रवींद्र संगीताचेही प्रवर्तक आहेत. पती आणि सासरच्या लोकांच्या पाठिंब्याने आणि प्रोत्साहनाने, इंदिराजींनी एका चित्रपटात अभिनयाचे काम स्वीकारले आणि स्क्रीन नाव म्हणून मौसमी घेतले. त्यामुळे तिच्या चित्रपट कारकिर्दीला लग्नानंतरच सुरुवात झाली.[] तिची मुलगी पायल १३ डिसेंबर २०१९ रोजी ४५ व्या वर्षी मरण पावली.[]

कारकीर्द

चॅटर्जीने तरुण मजुमदार दिग्दर्शित बंगाली बालिका बधू (१९६७) मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.[] एका मुलाखतीत, मौसमी चॅटर्जीने उद्धृत केले: "बालिका बधू नंतर, मला बंगाली चित्रपटांचा पूर आला होता, परंतु मला माझे शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा होती. तथापि, चित्रपट माझ्या नशिबात होते म्हणून मी दहावीत शिकत असताना, माझी एक जवळची मावशी होती. तिची मृत्यूशय्येची आणि तिची शेवटची इच्छा मला लग्न करून पाहण्याची होती. म्हणून तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी लग्न केले." [] त्यांना घरी इंदिरा म्हणून संबोधले जायचे. तिचे पालक आणि शेजारी हेमंत कुमार यांचा मुलगा जयंत मुखर्जी (बाबू) यांच्याशी लग्न झाले. "मी बाबूच्या प्रेमात पडले. माझ्या कुटुंबाबाहेरील माझ्या संपर्कात आलेला तो पहिला माणूस होता." [] त्यानंतर त्या परिणीता, अनिंदिता या बंगाली चित्रपटांमध्ये दिसल्या.

१९७२ मध्ये शक्ती सामंता दिग्दर्शित अनुराग या हिंदी चित्रपटातून त्यांनी प्रमुख महिला म्हणून पदार्पण केले. हा चित्रपट मोठा यशस्वी ठरला. त्यांनी एका आंधळ्या मुलीची भूमिका केली जी प्रेमात पडते, आणि सर्वोत्तम अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कारासाठी पहिले आणि एकमेव नामांकन मिळवले. अनुरागला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.[]

१९७३ मध्ये, त्यांनी शशी कपूरसोबत नैना, विनोद खन्नासोबत कुछ धागे आणि विनोद मेहरासोबत उस पार या चित्रपटात काम केले. १९७४ मध्ये, तिने थ्रिलर बेनाममध्ये तत्कालीन संघर्षशील अमिताभ बच्चन यांच्यासोबत आणि सस्पेन्स ड्रामा हमशकलमध्ये राजेश खन्ना सोबत काम केले. त्यांचा सर्वात यशस्वी चित्रपट १९७४ च्या शेवटी आला, जिथे मनोज कुमारच्या रोटी कपडा और मकानमध्ये त्यांनी बलात्कार पीडितेची भूमिका केली होती. [] त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी पहिले आणि एकमेव नामांकन मिळाले.

अनुराग, उस-पार, रफ्तार, उमर कैद, मजाक, जिंदगी आणि दो झूट यासह त्यांनी चित्रपटांमध्ये विनोद मेहरासोबत जोडी केली होती.[] त्यांनी अमिताभ बच्चन सोबत बेनाम आणि बासू चॅटर्जी यांच्या मंझिल (१९७९) चित्रपटात काम केले. उत्तम कुमार सोबतचा तिचा बंगाली चित्रपट, ओगु बोधू सुंदरी १९८१ मध्ये प्रदर्शित झाला आणि यशस्वी झाला. १९८२ मध्ये, तिने मराठी चित्रपट भन्नट भानू मध्ये "तुम्ही अडकित्ता मी हो सुपारी" या गाण्यासाठी पाहुणी कलाकाराची भूमिका केली. राजेश खन्नासोबतच्या त्यांच्या यशस्वी चित्रपटांमध्ये भोला भला, प्रेम बंधन आणि घर परिवार यांचा समावेश होता. त्यांनी संजीव कुमारसोबत अंगूर, दासी आणि इतनी सी बातमध्ये काम केले. १९८५ मध्ये त्यांनी प्रतिज्ञा या बंगाली चित्रपटात काम केले. १९८५ नंतर, त्यांनी वतन के रखवाले, आग ही आग आणि घायाल सारख्या अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या.

१९८०-९० च्या दशकात त्यांनी आई आणि वहिनी च्या भूमिका साकारल्या जसे की घायल, घर परिवार आणि आ अब लौट चलें (१९९९). चॅटर्जीने तनुजा चंद्रा यांच्या जिंदगी रॉक्ससह सिनेमात पुनरागमन केले. त्यांनी २००३ मध्ये इंडो-कॅनडियन प्रोडक्शन बॉलीवूड/हॉलीवूड मध्ये काम केले. []


राजकीय कार्य

चटर्जी यांनी २००४ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवली, परंतु त्यांचा पराभव झाला.[] २०१९ मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.[]

पुरस्कार

वर्ष पुरस्कार श्रेणी काम परिणाम
१९६८ बंगाल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशन सर्वोत्कृष्ट अभिनेत्री बालिका बधूविजयी
१९७२ फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्री अनुरागनामांकन
१९७४ सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री रोटी कपडा और मकाननामांकन
बंगाल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशन सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री विजयी
२००२ जिनी पुरस्कार सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री बॉलीवूड/हॉलीवूडनामांकन
२०१४ फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – बंगाली गोयनार बक्षोविजयी
२०१५ फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार जीवनगौरव पुरस्कार विजयी
२०१६ बंगाल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशन पुरस्कार विजयी
२०१८ पॉवर ब्रँड्स पत्रकार पुरस्कार विजयी

फिल्मोग्राफी

वर्ष चित्रपट भूमिका टिप्पणी
१९६७ बालिका बधूरजनी बंगाली चित्रपट
१९६९ परीणीतालोलिता
१९७२ अनुरागशिवानी
१९७३ नैनानैना
कच्चे धागेसोना
गुलाम बेगम बादशहालक्ष्मी
१९७४ जहरीला इन्सानआरती
उस पारकमला
रोटी कपडा और मकानतुलसी
हमशकलसीता
बेनामशीला
बदलाकल्पना
१९७५ उमर कैदडॉ. भारती
रफ्ताररानी/रिता
नाटक
मझाकमौसमी
दो झूटलाजवंती
अनाडीरश्मी
१९७६ सब्से बडा रुपैयासुनीता
जय बजरंग बलीदेवी
जिंदगीसीमा
१९७७ आनंद आश्रमकिरण
अब क्या होगा
हत्यारगैरी सिंह
१९७८ तुम्हारी कसमविद्या
स्वर्ग नरकशोभा
फूल खिले हैं गुलशन गुलशनशांती
फंदेबाजशांती
दिल और दिवारसरोजा
भोला भलारेणू
१९७९ दो लडके दोनो कडकेरानी
प्रेम बंधनमीना
गौतम गोवींदसंध्या
मंजिलअरुणा
लव्ह इन कॅनडासीमा
घरकी लाजजानकी
१९८० स्वयंवररूपा
मांग भरो सजनासीता
ज्योती बने ज्वालाअनू
चंबल की कसमतन्नीबाई
बदला और बलीदानज्योती
दो प्रेमीपायल/पार्वती
बे-रहम
१९८१ प्यासा सावनशांती
क्रोधी
इतनी सी बातआशा
ओगू बोधू शुंदरीशाबीत्री बंगाली चित्रपट
दासीमंगला
१९८२ रक्षाआशा
अंगूरसुधा
१९८३ जस्टीस चौधरीसौ. चौधरी
१९८४ पेट प्यार और पाप
जवानीप्रेमा मोहन
घर एक मंदीरलक्ष्मी भाभी
आन और शानराधा
१९८५ रुस्वाई
देखा प्यार तुम्हारासौ. मलीक
१९८६ उर्बशीउर्बशी बंगाली चित्रपट
१९८७ सिंदूर
आग ही आगगंगा सिंह
महानंदाबंगाली चित्रपट
मेरा कर्म मेरा धर्ममाला
वतन के रखवालेलक्ष्मी सूरज प्रकाश
परम धरमसावित्री सिंह
१९८८ तक्दीर का तमाशाग्रेटा
वक्त की आवाजजस्टीस शारदा
विजय रीटा
अग्नीशोभा
१९८९ आखरी गुलाम
आखरी बाझीसौ. पार्वती कुमार
जंग बाझसौ. सक्सेना
सिक्कालक्ष्मी
शहजादेपद्मीनी सिंह
१९९० घायलइंदू मेहरा
१९९१ घर परिवारपार्वती देवी
प्यार का देवताचिफ जस्टीस सरस्वती
१९९२ जुल्म की अदालतसौ. पितांबर
खुले-आमरुपादेवी
निश्चयरेणूका सिंह
१९९३ प्रतीक्षालक्ष्मी
संतानलक्ष्मी
१९९४ उधार की जिंदगीजानकी
इक्के पे इक्काकौशल्या देवी
१९९५ कर्तव्यशारदा वर्मा
जल्लादतारा देवी
१९९६ मुकद्दर
१९९८ करीब
डोली सजा के रखनाचंद्रकला बन्सल
किमत – दे आर बॅकसुलक्षणा
१९९९ आ अब लौट चलेंरमा खन्ना
२००२ ना तूम जानो ना हमसौ. मल्होत्रा
बॉलीवूड/हॉलीवूडमम्मीजी कॅनेडाचा चित्रपट
२००४ हम कौन हैं?मार्था पिन्टो
२००६ जिंदगी रॉक्सइंद्रानी सेनगुप्ता
२०१५ पिकूचोबॉ मासी
२००६ भालोबसर ओनेक नामबीनी बंगाली चित्रपट
२०१६ शेष संगबादएलिना
२०१० द जॅपनीज वाईफमासी
२०१३ गोयनार बक्शॉपीषी

दूरदर्शन

वर्ष मालिका भूमिका नोट्स
१९९३ अलबेलीअलबेली -
२०२१ सुपर डान्सरपाहुणे सीझन ४
२०२३ इंडियाज बेस्ट डान्सरपाहुणे सीझन ३

संदर्भ

  1. ^ Gupta, Priya (13 May 2015). "Moushumi Chatterjee: God is not kind to me, he is partial to me - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2 September 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "Veteran actress Moushumi Chatterjee moves Bombay HC, wants to meet comatose daughter". The Economic Times. 23 November 2018.
  3. ^ "Moushumi Chatterjee's daughter Payal dies at 45". India Today. 13 December 2019. 5 March 2019 रोजी पाहिले.
  4. ^ a b c "How Moushumi Chatterjee stunned Shakti Samanta in ANURAAG". glamsham.com. 27 April 2014 रोजी पाहिले.
  5. ^ "Bollywood News, Filmfare Awards, Movie Reviews, Celebrity Photos & Updates". 2023-05-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2024-02-19 रोजी पाहिले.
  6. ^ http://www.boxofficeindia.com/showProd.php?itemCat=180 [मृत दुवा]
  7. ^ a b "Bengali Beauty Moushumi Chatterjee - Ruling Bollywood Lady". businessofcinema.com. 26 April 2014. 27 April 2014 रोजी पाहिले.
  8. ^ "Actress Moushumi Chatterjee Joins BJP Just Months Ahead of Lok Sabha Polls". News18 (इंग्रजी भाषेत). 2 January 2019. 2 November 2020 रोजी पाहिले.
  9. ^ "Veteran Indian actor joins BJP, praises Modi". Khaleej Times. Indo-Asian News Service. 19 February 2019. 5 May 2019 रोजी पाहिले.