मौलाना आझाद थेट कर्ज योजना
अल्पसंख्याक समाजातील मुस्लिम, शिख, ख्रिश्चन, पारशी, बुद्धीष्ट व जैन समाजातील घटकांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी राज्य शासन पुरस्कृत योजना राबविली जाते. थेट कर्ज योजना ही मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या भागभांडवलातून राबविण्यात येते.
योजनेच्या प्रमुख अटी
- अर्जदार अल्पसंख्याक समाजातील असावा. मुस्लिम, शिख, ख्रिश्चन, पारशी.
- बुद्धीष्ट व जैन समाजाचा समावेश.
- अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
- अर्जदार कमीत कमी साक्षर असावा.
- वयोमर्यादा किमान 18 वर्ष.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न शहरी भागासाठी - रु.1,03,000/- पेक्षा कमी, ग्रामीण भागासाठी -रु.81,000/- पेक्षा कमी.
आवश्यक कागदपत्रे
- विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक सांक्षाकित कागदपत्रांच्या दोन प्रती.
- रहिवासी दाखला
- ओळखपत्र : अर्जदार व जामिनदार दोन्हीचे ( आधारकार्ड/इलेक्शन कार्ड/पारपत्रक)
- उत्पन्नाचा दाखला; शासकीय व खाजगी क्षेत्रातील कर्मचारी असल्यास फॉर्म नं.16 किंवा 20 रुपयाच्या बॉंड पेपरवर स्वतः प्रमाणित केलेल्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र.
- अर्जदार / जामिनदाराचे हमीपत्र बेबाकी प्रमाणपत्र.
- जामिनदार : अर्जदारास ओळखणाऱ्या व्यक्तीकडून कर्जासाठी हमी देत असल्याचे, विहित नमुन्यातील रु.100/-च्या स्टॅंप पेपरवरील हमीपत्र.
- विधवा महिलांसाठी पतीचा मृत्यू झाल्याबाबतचा ग्रामसेवक / नगरपालिका यांनी प्रमाणित केलेला दाखला.
- घटस्फोटीत महिलांकरिता घटस्फोट झाल्याबाबतचा न्यायालयाचा दाखला किंवा रु.20/-च्या बॉंड पेपरवर अर्जदाराचे स्वयंघोषित प्रमाणपत्र.
- दंगलपिडीत व्यक्तीबाबत पोलीस पंचनाम्याची प्रत.
- नैसर्गिक आपदग्रस्त व्यक्तींबाबत तलाठी / तहसिलदार / जिल्हाधिकारी यांचा अहवाल.
- दिव्यांगांना शासकीय रुग्णालयातील / जिल्हा शल्यचिकित्सक यांनी प्रमाणित केलेला दाखला.
- दारिद्रय रेषेखालील उमेदवारांना दारिद्रय रेषेखाली असल्याबाबतचे प्राधिकृत अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र जोडावे.
लाभाचे स्वरूप
- कर्ज मर्यादा 5 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत स्वगुंतवणूक 5 टक्के, कर्ज 95 टक्के व्याजदर (द.सा.द.शे.) 6 % परतफेड - 5 वर्षाच्या कालावधीत.
संपर्क
मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ मर्यादित, 2 रा मजला, डीडी बिल्डिंग, जुने कस्टम्स हाऊस, शहीद भगतसिंग मार्ग, मुंबई 400023 (दूरध्वनी क्रमांक 022-22672293)