Jump to content

मोहित शर्मा

मोहित शर्मा
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
मोहित महिपाल शर्मा
जन्म १८ सप्टेंबर, १९८८ (1988-09-18) (वय: ३५)
बल्लभगड, हरियाणा, भारत
टोपणनाव आशू
उंची १.८ मी (५ फूट ११ इंच)
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने जलद-मध्यमगती
भूमिका गोलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकदिवसीय पदार्पण (कॅप १९९) १ ऑगस्ट २०१३ वि झिम्बाब्वे
शेवटचा एकदिवसीय २६ ऑक्टोबर २०१५ वि दक्षिण आफ्रिका
एकदिवसीय शर्ट क्र.
टी२०आ पदार्पण (कॅप ४७) ३० मार्च २०१४ वि ऑस्ट्रेलिया
शेवटची टी२०आ ७ सप्टेंबर २०१५ वि इंग्लड
टी२०आ शर्ट क्र.
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०११–सद्यहरियाणा
२०१३–२०१५चेन्नई सुपर किंग्स (संघ क्र. १८)
२०१६–२०१८ किंग्स XI पंजाब (संघ क्र. १८)
२०१९चेन्नई सुपर किंग्स (संघ क्र. १८)
२०२०दिल्ली कॅपिटल्स
२०२३-सद्यगुजरात टायटन्स
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धाआं.ए.आं.टी२०प्र.श्रे.लि अ
सामने२६४४७८
धावा३१६४०२०२
फलंदाजीची सरासरी७.७५१३.०६११.२२
शतके/अर्धशतके०/००/००/००/०
सर्वोच्च धावसंख्या११*४९२४
चेंडू१,१२११३८६,७८८३,४९४
बळी३११२७६६
गोलंदाजीची सरासरी३२.९०३०.८३२४.५५३२.७९
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी४/२२२/२८५/२६४/२२
झेल/यष्टीचीत६/–१/–१२/–२८/-
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, २ ऑगस्ट २०२४

मोहित महिपाल शर्मा (जन्म १८ सप्टेंबर १९८८) हा भारताचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे. तो सध्या देशांतर्गत स्पर्धेत हरियाणाकडून तर आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळतो. तो उजव्या हाताने मध्यम जलदगती गोलंदाजी करतो.

देशांतर्गत आणि आयपीएल कारकीर्द

वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक इयान पाँट यांच्यासोबत काम केल्यानंतर शर्माने २०१२-१३ रणजी करंडक स्पर्धेमध्ये ७ सामन्यांत २३ च्या सरासरीने ३७ गडी बाद केले. त्यानंतर त्याला २०१३ च्या हंगामासाठी आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्सने करारबद्ध केले होते. २०१३ इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्याने १५ सामने खेळले आणि २३ विकेट घेतल्या.

डिसेंबर २०१८ मध्ये, २०१९ इंडियन प्रीमियर लीगसाठी खेळाडूंच्या लिलावात चेन्नई सुपर किंग्सने त्याला ५ कोटींना विकत घेतले.[][] २०२० आयपीएल लिलावापूर्वी चेन्नई सुपर किंग्सने त्याला सोडले.[] २०२० आयपीएल लिलावात, २०२० इंडियन प्रीमियर लीगच्या आधी त्याला दिल्ली कॅपिटल्सने विकत घेतले.[]

२६ मार्च २०२२ रोजी, मोहितला नवीन फ्रँचायझी गुजरात टायटन्सने आयपीएल २०२२ सीझनसाठी नेट गोलंदाज म्हणून सामील केले होते.[]

२०२३ च्या आयपीएल लिलावात, त्याला गुजरात टायटन्सने विकत घेतले आणि मोसमातील दुसऱ्या-सर्वोच्च बरोबरीत २७ विकेट्स घेऊन त्याने मोठे पुनरागमन केले.

२०२४ आयपीएल मध्ये, शर्माने दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात ७३ धावा देऊन आयपीएल इतिहासातील सर्वात वाईट गोलंदाजीचा विक्रम मोडला; नकोसा असा हा विक्रम यापूर्वी बेसिल थंपीने त्याच्या ७० धावांच्या स्पेलमाध्यम केला होता. ह्या सामन्यात मोहितच्या गोलंदाजी पृथ्थकरण होते ४-०-७३-०.

आंतरराष्ट्रीय कारकीर्द

भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्यात शर्माने झिम्बाब्वेविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यातून भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. शर्माने किफायतशीर गोलंदाजी केली (१० षटकात २/२६) आणि चौथ्या षटकात झिम्बाब्वेचा सलामीवीर फलंदाज सिकंदर रझाला बाद करत आपला पहिला बळी मिळविला. संदीप पाटील यांच्यानंतर एकदिवसीय पदार्पणातच सामनावीर म्हणून सन्मानित झालेला शर्मा दुसरा भारतीय ठरला.[][]

संदर्भयादी

  1. ^ "आयपीएल २०१९ लिलाव: करारबद्ध झालेल्या आणि न ना झालेल्या खेळाडूंची यादी". ईएसपीएन क्रिकइन्फो. २ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  2. ^ "आयपीएल २०१९ लिलाव: कोण कोणाला मिळाले". द टाइम्स ऑफ इंडिया. २ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  3. ^ "२०२० च्या लिलावापूर्वी आठ फ्रँचायझी कुठे आहेत?". ईएसपीएन क्रिकइन्फो. २ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  4. ^ "आयपीएल लिलावाचे विश्लेषण: आठ संघांचे सर्वोत्तम इलेव्हन आहेत का?". ईएसपीएन क्रिकइन्फो. २ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  5. ^ "आयपीएल २०२२ साठी गुजरात टायटन्सने मोहित शर्माचा नेट गोलंदाज म्हणून समावेश केला". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). २० मार्च २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ डेरेक अब्राहम (२ ऑगस्ट २०१३). "एकदिवसीय पदार्पणातच सामनावीर ठरलेला मोहित शर्मा संदीप पाटीलनंतर दुसरा भारतीय ठरला". २ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  7. ^ द्वैपायन दत्त (१ ऑगस्ट २०१३). "मोहित शर्माने भारतासाठी थेट आपली छाप पाडली". द टाइम्स ऑफ इंडिया. २ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.