मोहन जोशी (कोल्हापूर)
मोहन जोशी याच्याशी गल्लत करू नका.
मोहन जोशी (एम.ए. बी.लिब.) हे कोल्हापूरमध्ये राहणारे एक मराठी लेखक आहेत. त्यांनी बालसाहित्य आणि धार्मिक पुस्तकांव्यतिरिक्त काही कथा-कादंबऱ्याही लिहिल्या आहेत.
पुस्तके
- अनासक्त (निवडक कथांचा संग्रह)
- असे पुरस्कार अशी पारितोषिके (सुमारे २७ पुरस्कारांची माहिती)
- आपले पंतप्रधान (भारताच्या नऊ पंतप्रधानांची माहिती)
- आपले राष्ट्रपती (भारताच्या ऩऊ पंतप्रधानांची माहिती)
- आम्ही ज्येष्ठ (ललित)
- ऐकावे जनाचे (बालसाहित्य)
- त्रैलोक्याचे स्वामी (श्रीनृसिंहसरस्वती यांच्या जीवनावरील कादंबरी)
- निवडक पंतप्रधान (भाग १ ते ७)
- निवडक पंतप्रधान (सात पुस्तकांचा संच)
- परश्या (लघुकादंबरी)
- पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त मुलांचे मराठी पुस्तकांचे वाचन (बालसाहित्यासंबंधी, वैचारिक)
- बापूंच्या कथा (विनोदी कथांचा संग्रह)
- महाराष्ट्राचे मानकरी
- माझे २४ गुरू (मोहन जोशी यांना गुरुस्थानी असलेल्या २४ जणांची व्यक्तिचित्रणे)
- मुलांचे मोदी (बालसाहित्य)
- शब्दस्पंदन (कवितासंग्रह)
- शालेय सुविचार
- श्री क्षेत्र नृसिंहवाडी (धार्मिक - 'नृसिंहवाडी', 'दक्षिण काशी करवीरनिवासी श्री महालक्ष्मी' आणि 'श्री शाकंभरी, बनशंकरी, बदामी' ह्या ३ पुस्तकांचा संच)
- ज्ञानपीठाचे तॊस्वी (ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेल्या तीन मराठी साहित्यिकांची व्यक्तिचित्रणे)