मोहन आगाशे
मोहन आगाशे | |
---|---|
मोहन आगाशे (इ.स. २००८) | |
जन्म | २३ जुलै १९४७ महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | मराठा-भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय, मानसशास्त्रज्ञ |
कारकीर्दीचा काळ | १९८७ - सद्य (अभिनय कारकीर्द) |
भाषा | मराठी (मातृभाषा, अभिनय) हिंदी (अभिनय) |
प्रमुख चित्रपट | अब तक छप्पन जै रे जैत |
डॉ. मोहन आगाशे (जन्मदिनांक २३ जुलै १९४७ - हयात) हे मराठा-भारतीय नाट्य व चित्रपट अभिनेते आहेत. एप्रिल, इ.स. १९९७ ते एप्रिल, इ.स. २००२ या कालखंडात हे एफ.टी.आय.आय. या संस्थेचे सर्वसाधारण संचालक होते. इ.स. १९९६ साली नवी दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीने संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन यांना गौरविले.
आगाशे व्यवसायाने मानसशास्त्रज्ञ असून पुण्यातील भॉय जीजीभॉय वैद्यकीय महाविद्यालयात व ससून रुग्णालयात मानसशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम करतात.
पुरस्कार
- थेप्सो जीवनगौरव पुरस्कार (२४-१२-२०१७)
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील मोहन आगाशे चे पान (इंग्लिश मजकूर)
- आगाशे यांची मुलाखत Archived 2021-06-21 at the Wayback Machine.
- मोहन आगाशे यांची कारकीर्द Archived 2021-06-21 at the Wayback Machine.