Jump to content

मोह वृक्ष

मोह

शास्त्रीय वर्गीकरण

मोह ( शास्त्रीय नाव:Madhuca longifolia, मधुका लॉंगीफोलिया/लॉन्जीफोलिया;) हा उष्ण, कोरड्या जमिनीत येणारा पानझडी वृक्ष आहे. ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे[ संदर्भ हवा ].

धार्मिक महत्त्व

या झाडाला काही आदिवासी जमाती देव मानतात. या झाडाखाली त्यांचा देव मांडतात. बहुतेक आदिवासींचे सण/धार्मिक कार्यक्रम या झाडाच्या फुलांपासून बनविलेल्या दारूशिवाय (मोहाची दारू) पूर्ण होत नाहीत. पोलो हा सण साजरा करून फुले गोळा करण्याला सुरुवात करतात.

उपयोग

मोहाची फुले पहाटे गोळा करतात आणि ती वाळवून,साठवून ठेवतात. रोख पैशांची गरज असेल तेव्हा बाजारात विकतात. मोहाच्या फळामध्ये असणाऱ्या बीजाला टोळी असे म्हणतात. या बीपासून तेल काढले जाते. पूर्वीच्या काळी खाण्यासाठी मध्य भारतातील आदिवासी हेच तेल वापरत असत. अजूनही या भागातील गरीब लोक हे तेल वापरतात. फुले व फळे मार्च ते मे या कालावधीत मिळतात.या झाडाची मुळे व फ़ांद्या इंधन म्हणून वापरतात. मोहाचे लाकूड मोठे असते,पण जास्त काळ टिकत नाही. मोहफुले मार्च महिन्यात येतात. देवा-धर्मात,औषधात मोहफुलांचा फार उपयोग होतो. या फुलांपासून दारू काढतात. टोळ म्हणजे मोहाच्या झाडाचे फळ आहे. या टोळीचे तेल काढतात. दिवा लावायला व खाण्यासाठी हे तेल वापरतात. पण टोळीचे तेल गरम खाल्ले तर चांगले असते. थंड झाल्यास त्याचा खवट वास येतो. टोळीच्या आतल्या बियांपासून साबण बनवतात. टोळीचा जेवणात बराच उपयोग होतो. मोहाचे फुल पोष्टिक आहे;म्हणून ते गरोदर बाईला, आजारी माणसाला ते खायला देतात. मोहाने पोट भरते. मोह पथ्यावर चालते. कारण मोह गरम आहे. मोहाने खोकला होत नाही.

आराध्यवृक्ष

हा रेवती नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.

चित्र दालन

संदर्भ