Jump to content

मोरोची

मोरोची महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते शहराजवळील खेडे आहे. नातेपुतेपासून ६ किमी पश्चिमेस महाड-पंढरपूर राज्य महामार्गावर असलेल्या या गावात अंदाजे १५,००० व्यक्ती राहतात.

हवामान

येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो.येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा या गावातुन पंढरपूर येथे रवाना होतो.