मोरणा नदी
मोर्णा नदी याच्याशी गल्लत करू नका.
सांगली जिल्ह्यातील मोरणा ही वारणेची दुसरी महत्त्वाची उपनदी. या नदीचा उगम धामवडे टेकडीजवळ होतो. ही नदी दक्षिणेस व आग्नेयेस वाहते. नदीची लांबी सुमारे २७ किमी. आहे. तिच्या खोऱ्यात विस्तृत पानमळे आहेत. शिराळा तालुक्यातील मांगले गावाजवळ मोरणा नदी वारणेस मिळते.