मोनाली ठाकूर
मोनाली ठाकुर | |
---|---|
मोनाली ठाकूर | |
आयुष्य | |
जन्म | ३ नोव्हेंबर, १९८५ |
जन्म स्थान | कोलकाता |
संगीत साधना | |
गायन प्रकार | पार्श्वगायिका, शास्त्रीय गायिका, अभिनेत्री |
गौरव | |
पुरस्कार | फिल्मफेअर पुरस्कार (२०१४) |
मोनाली ठाकुर (बांग्ला: মোনালি ঠাকুর) ही एक भारतीय गायिका व अभिनेत्री आहे. पश्चिम बंगालमध्ये संगीताचा वारसा असलेल्या घराण्यामध्ये जन्मलेल्या व पंडित अजोय चक्रबर्ती ह्यांच्याकडून शास्त्रीय गायनाचे प्रशिक्षण घेतलेल्या मोनालीने आजवर अनेक बंगाली व बॉलिवूड चित्रपटांमध्ये गाणी म्हटली आहेत. २०१३ सालच्या लुटेरा चित्रपटामधील सवार लूं ह्या गाण्यासाठी तिला सर्वोत्तम महिला पार्श्वगायकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
गायनाबरोबरच अभिनयामध्ये देखील मोनाली कार्यरत असून तिने अनेक बंगाली चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत.
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2014-12-18 at the Wayback Machine.
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील मोनाली ठाकूर चे पान (इंग्लिश मजकूर)