Jump to content

मोतीबिंदू

मोतीबिंदू झालेला नेत्रमणी

मोतीबिंदू म्हणजे डोळ्यातील नैसर्गिक भिंग (नेत्रमणी) धुरकट होणे होय. सामान्य डोळ्यात प्रकाशकिरण पारदर्शक भिंगाद्वारे मागील पडद्यावर केंद्रित होतात. उत्तम दृष्टीकरिता नैसर्गिक भिंग (लेन्स) पूर्णतः पारदर्शक असणे आवश्‍यक असते. जेव्हा या लेन्सची पारदर्शकता मोतीबिंदू झाल्याने कमी होते तेव्हा रुग्णास अंधूक दिसू लागते. मोतीबिंदू अर्थात लेन्सला आलेला गढूळपणा काळानुसार वाढतच जातो व रुग्णास अधिकाधिक अस्पष्ट दिसू लागते. नेत्रमणी हा बहुतांशी प्रथिने व न्यूक्लिक आम्ल या जैविक रसायनांपासून बनलेला असतो. यात काही कारणांनी बदल झाल्यास नेत्रमण्यांची पारदर्शकता कमी होत जाते. त्यामुळे दृष्टी कमी होते. नेत्रमण्याच्या कोणत्याही भागास पारदर्शकत्व आले तर त्याला मोतीबिंदू असे म्हणतात.

कारणे

  • बरीच वर्षे कामासाठी किंवा काही नेहेमीच्या प्रसंगी सतत प्रखर प्रकाशाला सामोरे गेल्यास.
  • मधुमेह
  • दम्यासाठी स्टेरॉईड घेणे.
  • धूम्रपान करणे किंवा दारू पिणे.
  • जन्मतःच मोतीबिंदू असल्यास.
  • ग्लूकोमा (काचबिंदू)सारखी डोळ्यांची इतर समस्या असल्यास.

लक्षणे

  • डोळ्यांच्या बाहुल्या धुरकट किंवा सफेद होणे. डोळ्यांच्या मध्यभागी असणारा काळा गोल म्हणजे बाहुली.
  • रंग फिक्कट दिसतात.
  • सर्व काही अस्पष्ठ दिसते.
  • प्रकाशामुळे डोळे दुखतात व प्रकाश अतिप्रखर वाटतो.
  • रात्रीच्या वेळी प्रकाशाभोवती वलये दिसतात.
  • एका डोळ्याने दुहेरी दिसणे.
  • रात्रीच्या वेळी स्पष्ट न दिसणे.
  • चष्म्याची किंवा दृष्टीची औषधपत्रे (?) सतत बदलणे.

मोतीबिंदू होऊ नये म्हणून खाली दिल्याप्रमाणे उपाय करावे-

डोळ्यांची तपासणी Eye examination

५० वषे वय झाल्यावर प्रत्येक वर्षी डोळ्यांच्या डॉक्टरकडून डोळ्यांची तपासणी करून घेणे म्हणजे मोतिबिंदूचे सुरुवातीलाच निदान करून त्याची वाढ थांबवता येते.

डोळ्यांशी संबंधित कोणत्याही समस्या झाल्यावर मेडिकल शाॅप मधून कोणत्याही प्रकारची चालू दवा / ड्राॅप्स घेण्यापेक्षा डॉक्टरांकडून अवश्य तपासणी करून घेणे.

आहार / Diet : डोळ्यांचे आरोग्य चांगले टिकून राहण्यासाठी हिरव्या पानांची भाजी, फळे आणि Anti-Oxidant युक्त आहार घ्यायला हवा. आहारात गाजर, पालक, टोमॅटो, सफरचंद, संतरा, डाळिंब अशा Vitamin A, Vitamin C, Beta Caroteneचा समावेश करणे आवश्यक आहे.

चष्मा / Spectacle : जर नंबरचा चश्मा आहे तर तो डॉक्टरांच्या सल्लयानुसार नियमित वापरावा लागताो. प्रत्येक वर्षी डोक्याच्या डॉक्टरकडून नंबर वाढला किंवा कमी तर झाला नाही ह्याची तपासणी करून घ्यायला हवी. .जर उन्हात जायचे झाले तर उन्हाळ्यात लावायचा चष्मा वापरणे गरजेचे आहे.

रोग / Disease : जर उच्च रक्तचाप / Hypertension किंवा मधुमेह / Diabetes सारखे काही विकार असतील तर नियमित तपासणी, औषधे आणि पथ्य पालन करून त्यांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

नशा / Habit : जर माणसाला दारू, धूम्रपान किंवा तंबाखूसारख्या काही स्वास्थ्य विरोधी वस्तूंचे व्यसन असेल तर त्या गोष्टी त्वरित बंद करायला हव्यात..