Jump to content

मोजण्याची गोष्ट


मोजण्याची गोष्ट फार फार वर्षान पूर्वीची गोष्ट आहे . अगदी २५०० वर्षांपूर्वीची किंवा त्या पेक्षा ही जुनी असेल. ज्या वेळी मोजणे म्हणजे काय हेच माणसाला माहित नव्हते तो हा काल. मग त्या वेळी एका गावातील काही जणांना , विशेषता मुलांना , मोजावे असे कसे वाटले असेल आणि त्यांनी मोजायला कशी सुरुवात केली असेल त्याची ही गोष्ट आहे. देशो देशी अशाच प्रकारच्या गोष्टी सांगितल्या जातात , ही खास आपल्या कडची गोष्ट , चला ऐकू यात . एक गाव होते , धड खेड नाही आणि मोठे ही नाही असे ते गाव होते. गावकऱ्यांचा मुख्य धंदा गायी , बैल पाळणे आणि गायींचे दुध , दही,ताक,लोणी,तूप,खवा असे सगळे परिसरातल्या गावांमध्ये विकणे. साहजिकच गायींवर त्यांचे प्रेम होते , त्यांना ते खूप जपत असत. गावात काही मुलांचा गट होता. कान्हा,पुरू, आर्य , पेंद्या , सखा हे त्यातले प्रमुख. त्यांचा उद्योग म्हणजे गावभर उनाडक्या करत हिंडणे , खोड्या करणे , धमाल करणे. काय करत ते ?अहो काय करत नाहीत ते विचारा . चेंडूने एकमेकांना मारताना त्यांचा चेंडू चुकून कोणालातरी लागे , चुकून त्याची पगडी डोक्यावरून खाली पडे. गावातल्या मुली आणि बायका पाणी भरायला बाहेर पडत तर कधी चेंडूने , तर कधी अचूक मारलेल्या खड्याने त्यांच्या डोक्या वरचे माठ फुटत आणि त्या ओल्या चिंब होत, चुकून हा अगदी चुकून मुद्दाम नाही . मुले हसून हसून लोळत. विचारले तर अगदी चुकून झाले असे सांगत. कोणाच्या ही घरात शिरत आणि त्यांच्या कडचे दही ,लोणी नकळत खात. आधी असे वाटायचे कि घराच्या लेकी सूनाच खातात , त्यांना फुकट बोलणी बसायची. पण हे ह्याच गंगचे काम हे लक्षात आले. दोन मुलींच्या वेण्या बांध , गुरांच्या शेपट्या बांध एक न दोन ह्यांच्या खोड्यांना काही सुमारच नव्हता. बर इतर बाबतीतही ही मुले चलाख होती कोणी अडचणीत असेल तर मदत करत , बोलणे गोड ,लाघवी त्यामुळे गावकऱ्यांना ती आवडत सुद्धा , पण खोड्यांनी फार त्रास होत होता. त्यांच्या तक्रारी वाढत गेल्या , मग एक शक्कल गावातील मोठया जाणत्या लोकांनी काढली. नाहीतरी थोडे मोठे झाले कि ह्या मुलांना रानात गायी चारायला पाठवायाचेच आहे , आताच देऊ पाठवून . गावातून ही दूर जातील आणि थोडी जबाबदारी ही कळेल. गायी नीट नेऊन सांभाळून परत आणायला हव्यात हे त्यांना समजवून पक्के सांगू. हो न करता करता gangला थोड्या गायींना चरावयाला न्यायला पाठवले. गायीन बरोबर फिरायचे , त्यांना आपल्या नजरेच्या टप्प्यात ठेवायचे , एकत्र करून घरी आणायचे असे सुरू झाले. खेळायला मिळेनासे झाले , जेवताना सुद्धा गायीन्कडेच लक्ष ठेवायला लागायचे , ते सगळे एकमेकान बरोबर ही राहू शकत नव्हते. पण त्यानी विशेष त: कान्हाने ह्या गायींचे नीट निरीक्षण करायला सुरुवात केली , काळी ,गोरी, करडी अशा रंग बरोबरच कपाळावर चांदवा, शेपूट तुटके , पाठीवर वेगळ्या रंगाचा डाग असे एकेक करून सगळ्या गायी नेमक्या ओळखायला ते शिकले , मग मध्ये मध्ये एकत्र येऊन खेळायचे आणि परत आपापल्या गायीन बरोबर जायचे असे करायला लागले. पाव्याचा आवाज गायींना आवडतो आणि तो ऐकून त्या त्या आवाजाच्या दिशेने येतात हे त्यांच्या लक्षात आले. मग काय त्यांनी आपले खेळ सुरू केले , खेळणे मध्ये मध्ये गायींना जवळ जवळ आणणे त्या साठी पावा वाजवणे मग दुसऱ्या ठिकाणी जिथे गवत , झुडपे आहेत तिथे नेणे असा क्रम सुरू झाला . मुख्य म्हणजे खेळणं झाडावर चढणे , सूर पारंब्या , आबाधुबी खेळणे पाण्यात पोहणे ,डूम्बाने सुरू झाले....

मांजर कितीही डोळे मिटून दूध पीत असले तरी ते इतरांना कळतेच .गावकऱ्यांना हे कळलेच.ते येऊन बघूनही गेले. मुले खेळतात याचा त्यांना राग नव्हता पण  गायी कुठे जातात , त्या सगळ्याच्या सगळ्या परत येतात का असे प्रश्न त्यांना पडत होते . गायी वर त्यांचे जगणे अवलंबून होते त्यामुळे मुलांनी सतत गायींच्या बरोबरच रहावे असा त्यांचा आग्रह होता. 

सगळे गावकरी मग एके दिवशी वेशी पाशी जमले , मुले गायींना घेऊन वेशीवर येताच ओरडू लागले सगळ्या गायी परत आल्या नाहीत , कमी आहेत. मुले कोणत्या परत आल्या नाहीत असे विचारू लागले , करडी नाही आली ती बघा तिथे आहे असे चालूच राहिले. कोणाचेच कोणाला पटेना . त्याचे कारण काय ? तुमच्यातला कोणीही म्हणेल मोजायच्या आल्यात का आपल्या ५ गायी आल्यात न झाले . अहो ,पण त्यांना मोजयालाच येत नव्हते . तोच मुख्य प्रश्न होता. गावकऱ्यांना पटत नव्हते सगळ्या गायी परत आल्या , मुलांना तर कळत नव्हते कोणती नाही आली ? एक मोठा माणूस मुलां बरोबर जायला लागला . खेळ बंद , हिंडा गायीन मागोमाग. असे चालू झाले. कान्हा आणि मित्रांना खेळ बंद झाला ह्या पेक्षा आपण सगळ्या गायी नीट परत आणत नाही ह्या बोलण्याचा जास्त त्रास होत होता. त्यांना नक्की वाटत होते कि सर्वच्या सर्व गायी परत येतात , पण गावात ल्याना प्त्वायाचे कसे सुचत नव्हते . पेंद्या हा एक गमतीशीर मुलगा होता त्याचे लक्ष कधी कुठे जाईल हे सांगता येत नसे , त्या दिवशी अशीच त्याने एका झाडाची दोन तीन फुले घेतली , त्यांना तीन तीन ( आजच्या प्रमाणे ) पाकळ्या होत्या. त्या त्याने बरोबर जुळवल्या , आणि खुश होउन हसू लागला. दुसऱ्या दिवशी वेगळ्या झाडाच्या फुलाबद्दल हाच उद्योग केला , पाकळीला पाकळी जोडली , बरोबर जुळल्या, एक कमी नाही कि एक जास्त नाही. पहिल्यांदा सगळे त्याला हसले अरे एका झाडाची फुले सारखीच असणार. मग त्याने दोन वेगवेगळ्या झाडांची फुले घेतली , पाकळ्या जुळत नाहीत हे पण दाखवले , हसू लागला. दुसऱ्या दिवशी , एकाच झाडाचे फुल आणि त्याच झाडाचे दुसरे फुल पण त्या फुलाची पकली गळून पडली होती ते जुळत नाही हे बघितले. हा नाद लागला तो लागलाच. सात हजार सातशे चोपन्न वेळेला असे वेगवेगळ्या प्रकारे तो करू लागला. कान्हाचे त्याच्या कडे बारीक लक्ष होते , तो जे करतो आहे तो नाद , खेळ ह्या पेक्षा जास्त त्यात आहे हे त्याला कळत होते. पण नेमके काय ते कळत नव्हते. पेंद्या असा काही विचार न करता पण स्वाभाविक पाने जुळवून बघणे असे करत होता. मग अचानक त्याने सदाफुलीच्या पाकळ्यांवर एक एक बोट ठेवले आणि माझा हात कसा दिसतो म्हणून नाचायला लागला. तर कधी हेच जास्वन्दाने करायचा. मधली तीन बोटे बेलाच्या पानावर ठेवायचा नाचायचं. मग एक दिवस कान्हाने सर्वाना एकत्र बसवून पेंद्याला जास्वंद आणि सदाफुलीच्या पाकळ्या एकमेकांना जोडायला सांगितल्या , त्यावर बोटे ठेवली . मग एक बोट मुदापले एक पाकळी बाजूला केली मग दुसरे बोत्मुदापले दुसरी पाकळी असे करत हाताची बोटे आणि पाकळ्या एकदमच करून झाल्या. आता अजून वेगळ्या गोष्टी त्याने आणल्या होत्या , लाल छोटे मनी , एक बोट एका मान्यवर ठेवले तो मनी एका पाकळी वर असे करायला लागला. दुसऱ्या दिवशी असाच खेळ वेगवेगळी फुले आणि मनी . दगड घेऊन केला. मग अचानक एक पाकळी एका गायीवर , दुसरी पाकळी दुसऱ्या असे केले, दोन फुले पूर्ण होऊन गायी उरल्या. मग एका दिवशी संध्याकाळी त्याचा चेहरा उजळून निघाला. त्याने रात्री गावाच्या मुख्याल सांगितले , महाराज उद्या आम्ही गाई बाहेर नेताना तुम्ही सगळे वेशीपाशी या. आणि एक रांजण आणि रांजणचे तोंड बांधता येईल असे कापड आणा. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे वेशी पाशी जमले मुलांनी गायी आणून वेशीच्या अलीकडे उभ्या केल्या. कान्हाने रांजण आणून वेशीच्या कडेला सर्वाना दिसेल असा ठेवला. आणि सर्वाना सांगितले मी काय करतो ते बघा आणि पेंद्या काय सांगतो आहे ते ऐका. मुलांनी एक गाय वेशीतून बाहेर सोडली , कान्हाने एक खडा रांजणात टाकला . ‘ बघा ही गाय बाहेर गेली हा खडा रांजणात गेला , पुढची गाय बाहेर गेली एक खडा रांजणात टाकला. असेच एक गाय बाहेर , एक खडा रांजणात असे चालले. गावकरी उत्सुकतेने बघत होते. अखेर शेवटची गाय वेशी बाहेर पडल्या वर कान्हाने कापडाने रंजनाचे तोंड घट्ट बांधले. ‘ जितक्या गायी आम्ही नेल्या तितके खडे रांजणात आहेत. आता रांजण बंद केला आहे . आम्ही आल्या शिवाय उघडायचा नाही.लक्षात ठेवा जितक्या गायी बाहेर गेल्या आहेत तितकेच खडे रांजणात आहेत. ‘ फारसे काही कुणाला कळले नाही पण गंमत वाटली त्या विषयी बोलत बोलत ते गेले. संध्याकाळी , गायी वेशी बाहेर आणल्या आणि मुलांनी परत सर्वाना रंजनाच्या बाजूला , रांजण दिसेल अशा ठिकाणी आणले. कान्हाने सांगितले एक गाय आत आणली , एक खडा रांजानातून काढला आणि टाकून दिला. दुसरी गाय आत आली तिच्या साठी रांजणातील एक खडा मी बाहेर काढून टाकला. एकच गाय बाहेर उरली , तिला आत सोडले , एक खडा बाहेर काढून टाकला , पार लांब फेकला , आणि सांगितले बघा रांजण पूर्ण पाने रिकामा आहे. त्यात एक ही खडा नाही . जितक्या गायी बाहेर नेल्या तितके खडे आत टाकले होते. गाय आत आली कि एक खडा बाहेर काढला . आता रांजणात एकही खडा नाही . आम्ही नेलेल्या सगळ्या गायी परत आणल्या. ‘ पहिल्या दिवशी कोणालाच काहीही कळले नाही. मात्र दुसऱ्या दिवशी आणि नंतर नेमके सकाळी आणि संध्याकाळी काय केले जाते हे गावकरी नीट बघू लागले , मुलेही त्यांना समजावून देत . एक गाय बाहेर एक खडा रांजणात , पुढची गाय बाहेर अजून एक खडा आत , जितक्या गायी बाहेर तितके खडे रांजणात. एक गाय गावात , एक खडा रंजन्बाहेर , पुढची गाय गावात , पुढचा खडा बाहेर , सगळ्या गायी गावात सगळे खडे रंजना बाहेर रांजण रिकामे , असे म्हणता म्हणता . बऱ्याच जणांना हे केलेले बरोबर आहे हे लक्षात आले. त्यातले काही हुशार जन घरी बायकोला म्हणाले , विसळायला नेलेली सगळी मडकी ब्जंदी घरात येतात का बघायचे न क्र असे खडे आत एक भांडे बाहेर. मग तर ते भिंतीवर रेघा मारू लागले आणि आत येणाऱ्या भांड्य बरोबर एकेक रेघ पुसू लागले. सगळ्यांनाच आपण काहीतरी मस्त ,उपयोगी करतोय हे जाणवले. कान्हा आणि त्याच्या मित्रांना रागावणे तर सोडाच खूप कौतुकाने वागवले गेले. जवळच्या गावात ही पद्धत पसरली. राज दरबारी पोचली . हळू हळू मग अशा प्रकारे एकास एक संगती लावून मोजणे मान्य झाले. पुढे सोयीसाठी १,२ ,३ ,४ असे आकडे आणि त्यांच्या साठी नावे ठरवली गेली. जग मोजायला शिकले.’ गोष्ट ऐकणारे खुश झाले, तरी पण एकाने विचारलेच मी एक ,दोन ,पाच असे मोजतो , तो one ,two ,three ,five असे म्हणतो , आमचे मोजणे वेग वेगळे आहे का? नाही तू तीन चेंडू घे , त्याला three चेंडू घेऊ देत बघा जुळतात का? तू पाच बदल्या घे त्याला five मोठे चेंडू आण्याला संग बघ एकेक चेंडू एका एका बदली बसतो न ते. मग मोजणे म्हणजे काय ते महत्त्वाचे , जुळवून घेणे महत्त्वाचे त्या साठीचे शब्द दुय्यम . छोटा भीम आतापासून ५ गोळ्या न म्हणता प्रत्येक बोतासाठी एक गोळी असे म्हणायला लागला , आणि बाकीचे हसत त्याला शाबास म्हणू लागले.