मोगरा
मोगरा (शास्त्रीय नाव-Jasminum sambac कुल(Family) - Oleaceae एक प्रकारचे अत्यंत सुवासिक फूल आहे.[१] याच्या वेलीचा झुडपासारखा विस्तार होतो. मोगऱ्याच्या फुलापासून अत्तरही तयार करण्यासाठी वापरले जाते. मोगऱ्याचे फूल पांढऱ्या रंगाचे असते त्याला बिया नसतात. हे फुल २.५ सेमीचे असते. याचे दोन प्रकार आहेत .
१) अनेक पाकळीचे - यालाच बट मोगरा म्हणतात.
२) ६ पाकळ्याचे.
3) हजारी मोगरा
मोगऱ्याचे झाड चांगले वाढवण्यासाठी त्याला वसंत ऋतूच्या सुरुवातीला शेणखत घालतात. त्यानंतर मोगऱ्याची पाने वाढतात आणि पुढे कळ्यांचा बहर येतो. मोठ्या मोगऱ्याला आधार लावल्यास वाढीस मदत होते. फुलं येऊन गेल्यावर त्या भागाची छाटणी करतात.
पुनरुत्पादन
१. मोगऱ्याला बिया नसतात . त्याची रोपे तयार करावी लागतात. हे बहुवार्षिक पिक आहे, यासाठी जमिनीची चांगली नांगरट करावी लागते.जून, जुलै महिन्यात लागवड करावी. लांब वाढणारी मोगऱ्याची फांदी वाकवून नवीन ठिकाणी किंवा कुंडीत खुपसतात. किमान एक खोड- जिथून पाने फुटतात तो भाग - मातीखाली राहील अशी व्यवस्था केली की नोडपासून खाली मुळे फुटतात. तिथे नवीन वाढ होताना दिसली की आधीच्या फांदीचा भाग कापून नवीन रोप तयार करतात.मोगऱ्याचे फुल तिन्हीसांजेला उमलते. २. किमान चा्र पानांच्या जोड्या असतील अशा रीतीने फांदीचा तुकडा कात्रीने कापतात. खालची पाने कात्रीनेच कापून तो भाग कुंडीत अथवा मातीत खुपसून ठेवतात. ही माती कोरडी पडू देत नाहीत. साधारण दीड ते दोन महिन्यांनी वरच्या पानांच्या बेचक्यात नवीन फुटवा दिसला की खाली मुळे तयार झाली आहेत आणि नवीन रोप तयार झाले असे समजते.त्यानंतर रोपाला खत व पाणी घालावे. या फुलाला आणि त्याच्या रोपाला इतर भाषांत अशी नावे आहेत. :
- इंग्रजी : अरेबियन लिली, अरेबियन जास्मिन, संबॅक, तुस्कन-जस्मिन
- कानडी : मल्लिगे, इरावंतिगे
- गुजराती : मोगरो
- संस्कृत : अनंतमल्लिका, नवमल्लिका, प्रमोदिनी,
- हिंदी : चांबा, बनमल्लिका, मोगरा, मोतीया