Jump to content

मोईन शाकीर

डॉ. मोईन शाकिर आधुनिक भारतातील महत्त्वाचे राजकीय विचारवंत म्हणून ओळखले जातात.[] त्यांचा जन्म परभणी जिल्ह्यातील वसमतमध्ये 1940ला झाला. दहावीनंतर पुडील शिक्षणासाठी ते औरंगाबादला आले. शासकीय महाविद्यालयात ते प्राद्यापक होते. त्यानंतर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्णून रुजू झाले. कम्युनिस्ट पक्षाचे ते सक्रिय सदस्य होते.

डॉ. शाकिर यांनी मुसलमानांंतील सुधारणावादी चळवळीत दीर्घकाळ काम केले. भा. ल. भोले, राजेंद्र वोरा,असगरअली इंजिनिअर, प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांच्यासोबत त्यांनी महाराष्ट्रभर दौरे केले. भारतीय मुसलमान, खिलाफत चळवळ, महात्मा गांधी, मौलाना आजाद, मुहंमद इकबाल, इस्लाम व भारतातील धार्मिक हिंसाचार या विषयांवर त्यांनी अनेक लेख लिहिले आहेत.[]

प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांच्या मते ते केवळ इंग्रजीत लिहीत होते. लिखाणाची ही भाषा त्यांनी ठरवून निवडली होती. इकोनॉमिक पेलिटिकल विकली, मेनस्ट्रीम, दिस सोशालिस्टमध्ये ते नियमित लिहित असत. त्यांनी साम्राज्यवाद, भारतीय राजकारण, सांप्रदायिकता, इस्लाम आणि मुस्लिम विषयाच्या अनुषंगाने तब्बल 13 पुस्तके लिहिली आहेत. राजकीय विश्लेशक व मुस्लिम राजकारणाचे अभ्यासक म्हणून ते देशभरात परिचीत होते. १३ जून १९८७ रोजी औरंगाबाद येथे त्यांचे निधन झाले.[]

प्रकाशित ग्रंथ

  • गांधी, आझाद अँड नॅशनलिझम[]
  • मुस्लिम अँड इंडियन नॅशनल काँग्रेस (1988)
  • स्टेट अँड पॉलिटिक्स कंटेम्परी इंडिया (1986)
  • खिलाफत टू पार्टिशन
  • इस्लाम इन इंडियन पॉलिटिक्स (1983)
  • सेक्युलॅरिझम ऑफ मुस्लिम बिहेविअर (1973)
  • पॉलिटिक्स अँड सोसायटी, राम मोहन रॉय टू नेहरू
  • कम्युनॅलिझम इन इंडिया
  • मुस्लिम इन फ्री इंडिया
  • डेस्टिनी ऑफ इंडियन मुस्लिम
  • पॉलिटिक्स ऑफ मायनॉरिटीज
  • इस्लाम अँड इंडियन पॉलिटिक्स
  • स्टेट अँड पॉलिटिक्स अँड कंटेम्पररी इंडिया (1983)[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ https://www.epw.in/journal/1980/26/reviews-uncategorised/nationalism-and-communalism.html. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ https://www.epw.in/journal/1987/32/roots-specials/moin-shakir-memoriam.html. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ "समाज बुद्धिजीवी बने यहीं था मोईन शाकिर का सिद्धान्त". deccanquest.com. 2020-06-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-06-14 रोजी पाहिले.
  4. ^ https://www.amazon.in/Books-Moin-Shakir/s?ie=UTF8&page=1&rh=n%3A976389031%2Cp_27%3AMoin%20Shakir. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ "समाज बुद्धिजीवी बने यहीं था मोईन शाकिर का सिद्धान्त". deccanquest.com. 2020-06-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-06-14 रोजी पाहिले.