मॉहने धरण
मॉहने धरण जर्मनीच्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन राज्यातील मॉहने आणि हेवे नद्यांवरील मोठे धरण आहे. डॉर्टमुंडपासून ४५ किमी पूर्वेस असलेल्या या धरणाची क्षमता १३,५०,००,००० (साडे तेरा कोटी) मी३ आहे. याची बांधणी १९०८ ते १९१३ दरम्यान झाली होती. त्यावेळी हे युरोपमधील सगळ्यात मोठे धरण होते. या धरणातील पाण्याचा वापर पिण्यासाठी तसेच औद्यौगिक वापरासाठी होतो. याशिवाय हे धरण जलविद्युत निर्मितीकरता आणि रूह्र नदीतील नौकानयनासाठी पाण्याची पातळी राखण्याकरता वापरले जाते.
दुसऱ्या महायुद्धादरम्यान ब्रिटिश वायुसेनेने एका धाडसी मोहीमेत या धरणावर हल्ला चढवून हे फोडले होते. त्यामुळे आलेल्या पुरात अंदाजे १,६५० व्यक्ति मृत्यू पावले होते.[१] हा पूर २०-२६ फूट उंचीच्या पाण्याच्या लाटेच्या स्वरूपात होता व हे पाणी ताशी २०-२५ किमी वेगाने खोऱ्यातून गेले. या पाण्याच्या लोंढ्याने खोऱ्यातील माती हेक्टरी १६० मी३ दराने समुद्राकडे वाहून गेली. जर्मनीने अटलांटिक भिंतीवर काम करणारे बिगारी कामगार येथे आणून हे धरण काही महिन्यांत दुरुस्त केले होते.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "1943: RAF raid smashes German dams". BBC. 1943-05-17. 2007-05-17 रोजी पाहिले.