मॉलिब्डेनम
(Mo) (अणुक्रमांक ४२) रासायनिक पदार्थ.
पृथ्वीवर केवळ ०.०००३ % येवढ्या अल्प प्रमाणात मॉलिब्डेनम आढळते. हे प्रमाण नगण्य असले तरी जगाच्या अनेक भागात मॉलिब्डेनमचे साठे सापडले आहेत. मॉलिब्डेनम अतिकठीण असूनही तो तंतुक्षम आहे आणि रूळांच्या साहाय्याने किंवा ठोकून मॉलिब्डेनमला आकार देता येतो. ग्राफाईट प्रमाणेच मॉलिब्डेनममध्येही एकावर एक याप्रमाणे ढलप्यांची रचना आढळते. अशा १,६०० ढलप्या एकावर एक असलेल्या तुकड्याची उंची केवळ एक मायक्रॉन एवढी भरते.
१७७८ मध्ये स्वीडनचे रसायनशास्त्रज्ञ कार्ल विल्हेम शील यांनी मॉलिब्डेनमचा शोध लावला. "मॉलिब्डॉस" या ग्रीक भाषेतील शब्दावरून मॉलिब्डेनम हे नाव घेण्यात आले. याचा शब्दशः अर्थ शिसे असा होतो. प्राचीन ग्रीक लोकांना शिशाचे खनिज "गॅलेना मॉलिब्डेना" परिचित होते आणि त्यात मॉलिब्डेनाइटही होतेच. यामुळे कदाचित ही दोन्ही खनिजे एकच असावीत असे वाटल्याने त्यांनी शिसे असा अर्थ होत असलेले मॉलिब्डेनम हे नाव या द्रव्यास ठेवले असावे. १७८३ साली स्वीडनचेच रसायनशास्त्रज्ञ पी. एच. जेम यांना धातुरूप चूर्णाच्या रूपात हे मूलद्रव्य वेगळे करण्यात यश आले.
उपयोग
मॉलिब्डेनमचे अनेक उपयोग आहेत. मॉलिब्डेनमयुक्त रंग मृत्तिकाशिल्पात, प्लॅस्टिक उद्योगात, कातडी कमाविण्यासाठी, सुती व लोकरी कापड उद्योगात वगैरे केला जातो तर मॉलिब्डेनम ट्रायॉक्साइडचा उत्प्रेरक म्हणून तेलाच्या भंजनात व इतर रासायनिक प्रक्रियांमध्ये वापर होतो. उच्च वितळणबिंदू आणि अगदी कमी प्रसरणांक यामुळे विद्युत्अभियांत्रिकी, रेडियो इलेक्ट्रॉनिक्स व उच्च तपमान तंत्रक्षेत्रात मॉलिब्डेनमचा उपयोग केला जातो. नेहमीच्या विद्युतदीपातील (बल्ब) टंग्स्टनची तार मॉलिब्डेनमच्या खोबणीत बसवलेली असते तेच कार्य इलेक्ट्रॉन व क्ष-किरण नळ्यातदेखील मॉलिब्डेनमला करावे लागते. बंदुकीच्या नळ्या, विमाने व मोटारींचे विविध भाग, बाष्पयंत्रे, टर्बाइन, धातू कापण्याची यंत्रे या ठिकाणीसुद्धा मॉलिब्डेनमचे सहकार्य मोलाचे ठरते.
मॉलिब्डेनमच्या खनिजांचा मोठा भाग फेरोमॉलिब्डेनम या मिश्र धातू निर्मितीसाठी वापरला जातो. यामुळे उच्च दर्जाचे पोलाद तयार होते. टंग्स्टनही पोलादाच्या मजबुतीसाठी उपयोगी पडते पण मॉलिब्डेनम अधिक प्रभावी आहे. पोलाद निर्मितीच्यावेळी १ % टंग्स्टन वापरून जेवढी मजबुती आणता येते तेवढीच मजबुती केवळ ०.३ % मॉलिब्डेनम वापरून आणता येते शिवाय टंग्स्टनपेक्षा मॉलिब्डेनम स्वस्त पडत असल्याने मॉलिब्डेनमलाच लोखंडाचा एकनिष्ठ सहकारी म्हणले जाते.
ऍल्युमिनियम, तांबे, निकेल, कोबाल्ट, टायटॅनियम यांचा पायाभूत धातू म्हणून उच्च ताकदीच्या टंग्स्टन किंवा मॉलिब्डेनमच्या तंतूंचे बळकटी आणण्यासाठी उपयोग केल्याने वरील धातू / मूलद्रव्ये टायटॅनियमपेक्षा दुप्पट ताकदीचे होतात. वितळलेल्या काचेत मॉलिब्डेनम मिसळल्यावर काचेचा रंग सूर्यप्रकाशात निळा होतो आणि रात्री तीच काच पूर्णपणे पारदर्शी होते.
H | He | |||||||||||||||||||||||||||||||||||||||
Li | Be | B | C | N | O | F | Ne | |||||||||||||||||||||||||||||||||
Na | Mg | Al | Si | P | S | Cl | Ar | |||||||||||||||||||||||||||||||||
K | Ca | Sc | Ti | V | Cr | Mn | Fe | Co | Ni | Cu | Zn | Ga | Ge | As | Se | Br | Kr | |||||||||||||||||||||||
Rb | Sr | Y | Zr | Nb | Mo | Tc | Ru | Rh | Pd | Ag | Cd | In | Sn | Sb | Te | I | Xe | |||||||||||||||||||||||
Cs | Ba | La | Ce | Pr | Nd | Pm | Sm | Eu | Gd | Tb | Dy | Ho | Er | Tm | Yb | Lu | Hf | Ta | W | Re | Os | Ir | Pt | Au | Hg | Tl | Pb | Bi | Po | At | Rn | |||||||||
Fr | Ra | Ac | Th | Pa | U | Np | Pu | Am | Cm | Bk | Cf | Es | Fm | Md | No | Lr | Rf | Db | Sg | Bh | Hs | Mt | Ds | Rg | Cn | Uut | Uuq | Uup | Uuh | Uus | Uuo | |||||||||
|