मॉरीन स्टेपलटन
लोइस मॉरीन स्टेपलटन (२१ जून १९२५ – १३ मार्च २००६) एक अमेरिकन अभिनेत्री होती. ग्रॅमी अवॉर्डसाठी नामांकनाव्यतिरिक्त तिला अकादमी अवॉर्ड, गोल्डन ग्लोब अवॉर्ड, बाफ्टा अवॉर्ड, प्राइमटाइम एमी अवॉर्ड आणि दोन टोनी ॲवॉर्ड्ससह अनेक पुरस्कार मिळाले होते.
स्टॅपलटनचा जन्म ट्रॉय, न्यू यॉर्क येथे झाला, जॉन पी. स्टेपलटन आणि आयरीन (वॉल्श) यांची मुलगी आणि ती एका कठोर आयरिश अमेरिकन कॅथोलिक कुटुंबात वाढली.[१][२] तिचे वडील मद्यपी होते आणि तिचे पालक तिच्या लहानपणी वेगळे झाले.[३][४] स्टेपलटन वयाच्या १८ व्या वर्षी न्यू यॉर्क शहरात गेले आणि त्यांनी सेल्सगर्ल, हॉटेल क्लर्क, मॉडेल म्हणून काम केले व पैदे कमवले.[५]
रेड्स (१९८१) मधील एम्मा गोल्डमनच्या भूमिकेसाठी तिच्या अभिनयासाठी त्यांनी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी अकादमी पुरस्कार जिंकला. त्यापूर्वी तिला लोन्लीहार्टस (१९५८), एअरपोर्ट (१९७०), आणि इन्टेरिअर्स (१९७८) साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. रेड्ससाठी, स्टेपलटनने सहाय्यक भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा बाफ्टा पुरस्कारही जिंकला. एअरपोर्टसाठी तिला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला. इतर चित्रपाटांसाठी तिला पाच गोल्डन ग्लोब पुरस्कारांचे नामांकन मिळाले होते . त्यांच्या कामात बाय बाय बर्डी (१९६३), प्लाझा सूट (१९७१), द फॅन (१९८१), कूकून (१९८५), द मनी पिट (१९८६), आणि नट्स (१९८७) या इतर उल्लेखनीय चित्रपट भूमिकांचा समावेश होता.
तिला सात एम्मी पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले आणि एक दूरचित्रवाणी चित्रपट अमंग द पाथ्स टू ईडन (१९६७) साठी तिने हा पुरस्कार जिंकला होता.[६]
स्टेपलटनने १९४६ मध्ये द प्लेबॉय ऑफ द वेस्टर्न वर्ल्ड या नाटकातून ब्रॉडवे पदार्पण केले आणि १९५१ मध्ये द रोज टॅटू या नाटकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा टोनी पुरस्कार तिला मिळाला. द जिंजरब्रेड लेडी या नाटकासाठी १९७१ चा टोनी पुरस्कार देखील तिला मिळाला. तिला चार अतिरिक्त टोनी पुरस्कार नामांकन मिळाले होते [७] आणि १९८१ मध्ये अमेरिकन थिएटर हॉल ऑफ फेममध्ये तिचा समावेश करण्यात आला.
तिने अभिनयाचा तिहेरी मुकुट जिंकला. ग्रॅमी वगळता प्रत्येक प्रमुख कामगिरीचा पुरस्कार तिला मिळाला आहे. टू किल अ मॉकिंगबर्डच्या स्पोकन वर्ड रेकॉर्डिंगसाठी तिला १९७५ च्या ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.. तिला १९८१ मध्ये अमेरिकन थिएटर हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले. ती ली स्ट्रासबर्ग यांच्या नेतृत्वाखाली न्यू यॉर्क शहरातील प्रसिद्ध ॲक्टर्स स्टुडिओची माजी विद्यार्थिनी होती, जिथे तिची मॅरिलिन मनरोशी मैत्री झाली, जी स्टॅपलटनपेक्षा फक्त एक वर्ष लहान होती. स्टॅपलटन आणि मनरो यांनी ॲना क्रिस्टी या नाटकात एकत्र काम केले आहे. [८]
वैयक्तिक जीवन आणि मृत्यू
स्टेपलटनचे पहिले पती मॅक्स ॲलेंटुक होते, जे निर्मात्या कर्मिट ब्लूमगार्डनचे व्यवस्थापक होते. तिला तिच्या पहिल्या पतीपासून एक मुलगा, डॅनियल आणि एक मुलगी, कॅथरीन होती.[९] तिचे दुसरे पती नाटककार डेव्हिड रेफिएल होते ज्यांच्यापासून तिने १९६६ मध्ये घटस्फोट घेतला.[१०] तिची मुलगी, कॅथरीनने एकच चित्रपट भूमिका केली होती आणि तिचा मुलगा डॅनियल हा माहितीपट निर्माता आहे.
स्टेपलटन बऱ्याच वर्षांपासून चिंताविकार आणि मद्यपानाने ग्रस्त होती.[५] तिने सांगितले की तिचे दुःखी बालपण तिच्या असुरक्षिततेस कारणीभूत होते, ज्यात उड्डाण, विमाने आणि लिफ्टची भीती समाविष्ट होती.[११] आजीवन धुम्रपान करणाऱ्या स्टेपलटनचा २००६ मध्ये मॅसॅच्युसेट्समधील लेनॉक्स येथील तिच्या घरी क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीजमुळे मृत्यू झाला.[५]
१९८१ मध्ये स्टेपलटनच्या बालपणीच्या ट्रॉय, न्यू यॉर्क शहरातील हडसन व्हॅली कम्युनिटी कॉलेजने तिच्या नावाने एक थिएटर समर्पित केले.[१२]
संदर्भ
- ^ Sean O'Driscol (March 2006). "Stapleton, Oscar Winner, Dies at 80". Irish Abroad. March 3, 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. May 11, 2008 रोजी पाहिले.
- ^ Tom Vallance (March 15, 2006). "Maureen Stapleton". The Independent. January 13, 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. May 11, 2008 रोजी पाहिले.
- ^ "Famed Actress Maureen Stapleton Dies". CBS News. The Associated Press. March 13, 2006. March 2, 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. May 11, 2008 रोजी पाहिले.
- ^ Robert Berkvist (March 19, 2006). "Maureen Stapleton; actress collected Oscar, Tonys, Emmy". The San Diego Union-Tribune. September 9, 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. May 11, 2008 रोजी पाहिले.
- ^ a b c Berkvist, Robert (March 13, 2006). "Maureen Stapleton, Oscar-Winning Actress, Is Dead at 80". The New York Times. May 4, 2008 रोजी पाहिले.
- ^ "Maureen Stapleton". Television Academy (इंग्रजी भाषेत). October 5, 2020 रोजी पाहिले.
- ^ "Maureen Stapleton Tony Awards Info". www.broadwayworld.com. October 5, 2020 रोजी पाहिले.
- ^ "Maureen Stapleton: Almost an EGOT". Legacy (इंग्रजी भाषेत). March 13, 2014. October 5, 2020 रोजी पाहिले.
- ^ Berkvist, Robert (March 13, 2006). "Maureen Stapleton, Oscar-Winning Actress, Is Dead at 80". The New York Times (इंग्रजी भाषेत). ISSN 0362-4331. June 21, 2021 रोजी पाहिले.
- ^ Daniel McEneny (June 2009). "National Register of Historic Places Registration: David Rayfiel House". New York State Office of Parks, Recreation and Historic Preservation. October 19, 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. May 15, 2011 रोजी पाहिले.
- ^ Haun, Harry (September 20, 2006). "Friends and Colleagues Remember Maureen Stapleton at Memorial". Playbill (इंग्रजी भाषेत). October 5, 2020 रोजी पाहिले.
- ^ "College to Call Theater The Maureen Stapleton". The New York Times. November 30, 1981. May 4, 2008 रोजी पाहिले.