Jump to content

मॉन्मथपीडिया

विकिपीडिया शहर म्हणजेच जगातील कुठलेही एक असे शहर की ज्या शहरातील कोणत्याही दखलपात्र विभागाची सर्व माहिती त्या शहरातील क्यूआर संकेतांच्या[] माध्यमातून स्मार्टफोनवर उपलब्ध होऊ शकते.

१. मॉन्मथ

युनायटेड किंग्डमच्या वेल्स प्रांतातील मॉन्मथशायर या विभागात असणारे मॉन्मथ हे शहर येत्या शनिवारी म्हणजेच दिनांक २६ मे, २०१२ रोजी जगातील पहिले विकिपीडिया शहर बनणार आहे.[][][]. येथे जवळपास १००० ठिकाणी क्यूआर संकेत लावण्याचे काम पूर्ण झाले आहे. या संकेतांचा वापर करून येथील माहिती सुरुवातीला २६ भाषांमधून उपलब्ध करून दिली जाणार आहे.

संकिर्ण

विकिपीडिया संस्थापक जिमी वेल्स यांनी मॉन्मथसारखीच अनेक विकिपीडिया शहरे निर्माण होऊ शकतात असा आशावाद व्यक्त केला आहे.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ QR Code (Quick Resoonse Code चे लघुरूप)
  2. ^ "मॉन्मथ टू बी वेल्स्ज फस्ट वायफाय टाऊन". 29 February 2012. 2013-11-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-05-22 रोजी पाहिले.
  3. ^ "वेल्स टाऊन ऑफ मॉन्मथ गेट्स विकिपीडिया ट्रीटमेंटt". 26 January 2012. 2012-04-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-05-22 रोजी पाहिले.
  4. ^ "मॉन्मथ टू बी फस्ट विकी टाऊन". 18 January 2012. 2013-11-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-05-22 रोजी पाहिले.