मॉडेल रॉकेट्री
मॉडेल रॉकेट्री हे ठाणे येथील परममित्र पब्लिकेशन्स या प्रकाशनसंस्थेने प्रकाशित केलेले पुस्तक आहे.
लेखक : - पंकज कालुवाला
प्रकाशक : - परममित्र पब्लिकेशन्स, ठाणे
पृष्ठे....146 किंमत .......200/-
अवकाश आणि त्या अवकाशाला आपल्या कवेत घ्यायचं साधन म्हणून अग्निबाण, हे मानवाचं फारच प्राचीन आकर्षण आहे.युद्धोपयोगी साधन म्हणूनही त्याचं महत्त्वं आहेच. म्हणूनच जगभरांतून अग्निबाण आणि त्यांच्या उपयोगांवर मोठ्या प्रमाणावर संशोधन होत असतं. या क्षेत्राला असणारी तज्ज्ञांची मोठी गरज आणि त्यांचं उच्चं शैक्षणिक मूल्यं पाहून युरोप-अमेरिकेतून ही गरज पूर्ण करण्यासाठी छंद म्हणून जोपासण्यास मॉडेल रॉकेट्रीच्या उपक्रमाला पद्धतशीरपणे चालना दिली जाते. त्यासाठी तेथली शासनव्यवस्था,शैक्षणिक संस्था आणि हौशी मंडळीही आपलं योगदान देत असतात. दुर्दैवाने भारतात तशी पोषक परिस्थिती निर्माण झालेली नाही. परंतु ते चित्र बदलण्याच्या दृष्टीने छोट्या-मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
अनुक्रम मनोगत इतिहासाचे सिंहावलोकन .............1 अग्निबाणाची प्राथमिक रचना........24 अग्निबाणासाठीची प्रणोदकं...........38 अग्निबाणाची मोटर सिस्टम..........69 संपूर्ण अग्निबाणाची रचना...........91 अग्निबाणाच्या उड्डाण्पूर्व चाचण्या..111 प्रक्षेपण क्षेत्राची मांडणी..............127 अग्निबाणाचे ट्रॅकिंग.................133 परिशिष्टे............................137