Jump to content

मैदानी खेळ

मैदानी खेळ म्हणजे असे खेळ जे मैदानावर खेळले जातात. या खेळांमध्ये संपूर्ण शरीराची हालचाल होते. मैदानी खेळ खेळण्याने शरीर स्वस्थ राहतं. शरीराचा व्यायाम होतो, आणि शरीर तंदुरुस्त राहते. मैदानी खेळ हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही खेळ हे एकट्याने खेळायचे असतात तर काही अनेक खेळाडू एकत्र येऊन खेळले जातात. या खेळांमध्ये क्रिकेट, फूटबॉल, उंचउडी, लंगडी, खो-खो, कबड्डी, बॅडमिंटन, बास्केटबॉल, थ्रोवबॉल, पकडापकडी, आशा विविध खेळांचा समावेश होतो. मैदानी खेळ हे प्रत्येक वयोगटाचे व्यक्ती आनंदाने खेळतात.

१) बॅडमिंटन- रॅकेट व फूल यांच्या साह्यायाने खेळला जाणारा खेळ. हा खेळ इंग्लंड मध्ये तसेच जगातील अनेक भागात बऱ्याच काळापासून खेळत असले तरी आधुनिक बॅडमिंटनची रचना व नियमीकरण पुण्यामध्ये प्रथम विकसित झाल्याचे मानण्यात येते[संदर्भ हवा]. बॅडमिंटन ह्या खेळास पूना(पुण्याच्या नावावरून ओळख) असे देखील म्हणले जाते.

२) कुस्ती - कुस्ती हा फार जुना मर्दानी खेळ आहे. पूर्वी हा खेळ फक्त मुले आणि पुरुषच खेळत असत, परंतु आता या खेळामध्ये मुलीही सहभागी होतात. कुस्ती हा खेळ भारतातच नव्हे तर इतर अनेक देशांमध्येही लोकप्रिय आहे. पारंपरिक पद्धतीने कुस्ती ही तांबड्या मातीत खेळली जाते, परंतु कुस्तीच्या ओलिंपिक सामन्यांमध्ये हा खेळ एका जाड सतरंजीवर खेळला जातो. हा खेळ खेळण्यासाठी दोन खेळाडूंची आवश्यकता असते. या खेळांमध्ये डाव, चपळता , निर्णयक्षमता फार महत्त्वाची ठरते. या खेळातील डावांचे विविध प्रकार असतात त्यामध्ये कलाजंग, ढाक, मोळी, निकाल, आतील व बाहेरील टांग, एकेरी पट, दुहेरी पट, गदालोट, एकचाक, धोबीपछाड इत्यादी प्रकारांचा समावेश असतो.