मैथिली ठाकूर
मैथिली ठाकूर | |
---|---|
मैथिली ठाकूर | |
आयुष्य | |
जन्म | २५ जुलै, २००० |
जन्म स्थान | मधुबनी, बिहार |
व्यक्तिगत माहिती | |
धर्म | हिंदू |
नागरिकत्व | भारतीय |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
पारिवारिक माहिती | |
आई | भारती ठाकूर |
वडील | रमेश ठाकूर |
संगीत साधना | |
गायन प्रकार | शास्त्रीय संगीत |
संगीत कारकीर्द | |
पेशा | गायिका |
कारकिर्दीचा काळ | जानेवारी २०१४ – आजतागायत |
गौरव | |
पुरस्कार | सांस्कृतिक राजदूत वार्षिक पुरस्कार (२०२४)[१] |
मैथिली ठाकूर (जन्म:२५ जुलै, २०२२) ही भारतीय शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीतामध्ये प्रशिक्षित भारतीय पार्श्वगायिका आहे.[२] तिने हिंदी, मराठी, मैथिली, उर्दू, भोजपुरी, पंजाबी, तमिळ, इंग्रजी सह विविध भारतीय भाषांमध्ये स्वतःची गाणी, जुनी चित्रपट गीते आणि पारंपारिक लोकसंगीत गायले आहेत.[३]
प्रारंभिक जीवन
ठाकूर यांचा जन्म बिहार मधील मधुबनी जिल्ह्यातील बेनीपट्टी गावी संगीतकार आणि संगीत शिक्षक पंडित रमेश ठाकूर आणि भारती ठाकूर यांच्या पोटी झाला. रमेश ठाकूर हे दिल्ली येथे कार्यरत आहेत.[४] मैथिली हे नाव देवी सीता आणि तिची मातृभाषा (मैथिली भाषा) यावरून ठेवण्यात आले आहे. मैथिलीला तिचे दोन भाऊ, ऋषव आणि अयाची यांच्यासह त्यांच्या आजोबांनी आणि वडिलांकडून मैथिली लोकगीत, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, हार्मोनियम आणि तबला यांचे प्रशिक्षण मिळाले. ती सहा वर्षांची असताना आपल्या मुलीची क्षमता ओळखून, तिच्या वडिलांनी चांगल्या संधींसाठी नवी दिल्लीतील द्वारका येथे स्थलांतर केले.[५] मैथिली आणि तिचे भाऊ बालभवन इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकले जिथे त्यांनी शाळेसाठी विविध राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा जिंकल्या. वयाच्या १० व्या वर्षी तिने जागरण आणि इतर संगीत कार्यक्रमांमध्ये गाणे सुरू केले.[६]
संगीत कारकीर्द
इ.स. २०११ मध्ये, ठाकूर प्रथम झी टीव्हीच्या लिटिल चॅम्प्समध्ये सहभागी झाली. चार वर्षांनंतर, तिने सोनी टीव्हीवर प्रसारित झालेल्या इंडियन आयडॉल ज्युनियर स्पर्धेत भाग घेतला.[५] तिने २०१६ मध्ये "आय जिनियस यंग सिंगिंग स्टार" ही स्पर्धा जिंकली. त्यानंतर तिने तिचा अल्बम, या रब्बा (युनिव्हर्सल म्युझिक) लाँच केला.[७]
रायझिंग स्टार
इ.स. २०१७ मध्ये, ठाकूरने कलर्स टीव्ही वरील 'रायझिंग स्टार' नावाच्या गायन स्पर्धेच्या 'सीझन-१' मध्ये भाग घेतला. मैथिली ही शोची पहिली फायनलिस्ट होती, तिने 'ओम नमः शिवाय' गाणे गायले आणि तिला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळाला.[८] पण शेवटी अवघ्या दोन मतांनी पराभूत होऊन ती उपविजेती ठरली.[९] या शो नंतर, तिच्या इंटरनेटवरील लोकप्रियतेत लक्षणीय वाढ झाली.[५]
इ.स. २०१९
फेसबुक आणि यूट्यूब वरील व्हिडिओंमधून मोठ्या यशानंतर ही तीन भावंडे विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रम, लिटरेचर फेस्टमध्ये सहभागी होऊ लागले. मैथिलीला भारत सरकारने 'अटल मिथिला' सन्मान प्रदान केला आहे.
इ.स. २०१९ मध्ये मैथिली आणि तिचे दोन भाऊ, ऋषव आणि अयाची यांना निवडणूक आयोगाचे मधुबनीचे ब्रँड अॅम्बेसेडर बनले होते. ऋषव तबल्यावर आहे आणि अयाची हा गायक आहे आणि अनेकदा तालवाद्यावरही सादर करतो.[३][१०]
मानसपथ
मैथिली ठाकूर तिच्या 'मानसपथ' नामक यूट्यूब चॅनेलवर आपली दोन धाकटी भावंडे ऋषव आणि अयाची यांच्यासह तुलसीदासांचे प्रसिद्ध रामचरितमानसचे क्रमशः गायन करत आहे. या चॅनेल वर आतापर्यंत तिने विविध भारतीय भाषेतील अनके जुनी चित्रपट गीते, लोकगीते तसेच स्वरचित गाणी गायली आहेत.[३]
पुरस्कार आणि सन्मान
- मैथिली ठाकूर यांना ८ मार्च २०२४ रोजी उद्घाटन राष्ट्रीय रचनाकार पुरस्कार प्रकारच्या उद्घाटन प्रसंगी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यावर्षीचा सांस्कृतिक राजदूत पुरस्कार प्रदान करण्यात आला.[१][११]
संदर्भ
- ^ a b "RJ रौनक, जया किशोरी, मैथिली ठाकुर... PM Modi ने इन हस्तियों को दिया नेशनल क्रिएटर्स अवॉर्ड". jagran.com. ११ मार्च २०२४ रोजी पाहिले.
- ^ Whitehead, Kate (9 March 2020). "Meet Maithili Thakur, India's teenage folk-singing internet sensation". South China Morning Post (इंग्रजी भाषेत). 6 May 2020 रोजी पाहिले.
- ^ a b c Khurana, Suanshu (29 April 2019). "Vocalist Maithili Thakur and her three brothers on being Election Commission's brand ambassadors in Madhubani". The Indian Express (इंग्रजी भाषेत). ११ मार्च २०२२ रोजी पाहिले.
- ^ "बिहार की ये बेटी रातों रात बन गई सिंगिंग सेंसेशन, मात्र 18 वर्ष की उम्र में फेसबुक ने बनाया सुपरस्टार". Amar Ujala. 10 October 2018. 18 August 2019 रोजी पाहिले.
- ^ a b c Bhatt, Shephali (4 November 2019). "How life changes for internet celebrities – good, better, and sometimes worse". The Economic Times. 18 August 2019 रोजी पाहिले.
- ^ "The hard road to success for YouTube star Maithili Thakur". IndianSpice (इंग्रजी भाषेत). 2021-04-04. 2021-08-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-08-07 रोजी पाहिले.
- ^ "Max Life Insurance launches 3 albums for the Winners and Runner's Up of i-genius Young Singing Stars Season 2". The Hans India (इंग्रजी भाषेत). 14 September 2016. ११ मार्च २०२२ रोजी पाहिले.
- ^ "Rising Star: Maithili Thakur is the first finalist; who'll ultimately win the show?". India Today. 17 April 2017. ११ मार्च २०२२ रोजी पाहिले.
- ^ PTI (24 April 2017). "Bannet Dosanjh wins Rising Star, defeats Maithili Thakur by just two votes". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). ११ मार्च २०२२ रोजी पाहिले.
- ^ "गायिका मैथिली ठाकुर बनीं मधुबनी की ब्रांड एंबेस्डर, निर्वाचन आयोग ने लिया फैसला". Zee News Hindi (इंग्रजी भाषेत). 3 December 2018. 18 August 2019 रोजी पाहिले.
- ^ "'People are tired of listening to me': PM Modi's light-hearted exchange with singer". The Times of India. 2024-03-08. ISSN 0971-8257. 2024-03-09 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील मैथिली ठाकूर चे पान (इंग्लिश मजकूर)