मैत्री (पुणे)
मैत्री पुणे ही मेळघाटासारख्या दुर्गम भागातील आदिवासींसाठी काम करणारी सामाजिक संस्था आहे. मेळघाट आणि परिसरातील २८ गावांमध्ये मैत्री संस्थेमार्फत बालमृत्यू रोखण्यासाठी मेळघाट मित्र हा उपक्रम राबविण्यात येतो.
उपक्रम
आरोग्य शिबिर, स्वच्छता, व्यवसाय शिक्षण, शालेय शिक्षण आदी उपक्रम ही संस्था राबविते. संस्थेसाठी देणग्या मिळवण्यापेक्षा प्रत्यक्ष लोकसहभागातून निधी जमवावा, अशी कल्पना मैत्रीच्या स्वयंसेवकांच्या मनात आली. आणि त्यांनी २००६ पासून पुण्यातील मोठ्या सोसायट्यांमधून रद्दी जमवून ती विकून निधी संकलनास सुरुवात केली. या उपक्रमाला संस्थेने रद्दीतून सद्दी असे नाव दिले आहे.