Jump to content

मेलबर्न

हा लेख ऑस्ट्रेलिया तील मेलबर्न शहराबद्दल आहे. मेलबर्नच्या इतर उपयोगांसाठी पहा - मेलबर्न (निःसंदिग्धीकरण).

मेलबर्न
Melbourne
ऑस्ट्रेलियामधील शहर


मेलबर्न is located in ऑस्ट्रेलिया
मेलबर्न
मेलबर्न
मेलबर्नचे ऑस्ट्रेलियामधील स्थान

गुणक: 37°49′1″S 144°58′1″E / 37.81694°S 144.96694°E / -37.81694; 144.96694

देशऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
राज्य व्हिक्टोरिया
स्थापना वर्ष ३० ऑगस्ट १८३५
क्षेत्रफळ ८,८०६ चौ. किमी (३,४०० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १०२ फूट (३१ मी)
लोकसंख्या  
  - शहर ४० लाख
  - घनता १,५६६ /चौ. किमी (४,०६० /चौ. मैल)
http://www.melbourne.vic.gov.au


मेलबर्न हे ऑस्ट्रेलिया देशाच्या व्हिक्टोरिया ह्या राज्याची राजधानी व ऑस्ट्रेलियातील प्रमुख शहर आहे. इ.स. २००६च्या जनगणने नुसार येथील लोकसंख्या ३७ लाख ४० हजार आहे. येथे राहणाऱ्या लोकांना मेलबर्नीयन असेही संबोधले जाते. हे शहर ऑस्ट्रेलियाचे सांस्कृतिक राजधानीचे शहरही मानले जाते. येथे मेलबर्न क्रिकेट ग्राउंड आहे. पहिली ऑस्ट्रेलियन संसद या शहरात होती. ती नंतर कॅनबेरा या नवीन राजधानीच्या ठिकाणी हलवण्यात आली. मात्र संसदेची कोरीव काम व सुंदर दिवे असलेली प्रेक्षणीय इमारत येथे अजूनही आहे. या शहराच्या मुख्य भागातून यारा नदी नावाची नदी वाहते.

परिवहन

मेलबर्न शहर मेलबर्न विमानतळ नावाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाद्वारे जगाशी जोडलेले आहे. आंतरराष्ट्रीय विमानांबरोबरच स्थानीय विमानेही येथूनच सुटतात. स्थानीय सेवेत जेटस्टार व व्हर्जिन ऑस्ट्रेलिया या विमान सेवा उपलब्ध आहेत. विमानतळापासून शहरात येण्यासाठी द्रुतगती मार्ग आहेत. विमानतळापासून स्कायबस ही सेवा, टॅक्सीज तसेच भाड्याच्या गाड्या उपलब्ध आहेत त्या परिवहनासाठी मिळतात. मात्र मेलबर्नचे सार्वजनिक परिवहन उपलब्ध नाही. या शिवाय शहरात मुराब्बीन व इतर छोटी विमानतळेही आहेत. शहराच्या मुख्य भागात फिरण्यासाठी दर वीस मिनिटांनी एक मोफत ट्रॅमही आहे. शहराचे सर्व विभाग शहर बस सेवा, ट्रॅम व रेल्वे द्वारे जोडलेले आहेत.

शिक्षण

मेलबर्न येथे अनेक विद्यापीठे आहेत. जसे

अनेक भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येत असतात. शिक्षणाचे माध्यम इंग्लिश भाषा आहे. शहराला द एजहेराल्ड सन या दोन मुख्य वृत्तपत्रांसहीत मोफत वाटले जाणारे एमएक्स हे वृत्तपत्र आहे.

इतिहास

येथे इ‌.स. १९५६ साली ऑलिंपिक खेळ तसेच इ‌.स. २००६ साली राष्ट्रकुल स्पर्धांचे आयोजन केले गेले होते. या शहराची स्थापना इ‌.स. १८५० साली यारा नदीच्या काठी झाली. या विभाग पुर्वी वुरुंजरी नावाची आदिवासी जमात रहात असे. या जमातीतल्या आठ मुख्य नेत्यांशी, जॉन बॅटमन (इंग्रजी: John Batman) यांनी इ‌.स.१८३५ मध्ये तडजोड करून सुमारे २४०० किमी जमीन आपल्या ताब्यात घेतली व या शहराची स्थापना केली. इ‌.स. १८५० साली व्हिक्टोरिया राज्य येथे सोने सापडल्यावर येथे माणसांचा महापूर उसळला. सन इ‌.स. १८८० मध्ये हे जगातले सगळ्यात श्रीमंत शहर मानले जायला लागले. सन इ.स. १९९२ साली शहराची आर्थिक स्थिती सुधारावी व येथे पर्यटकांना आकर्षीत करावे या हेतुने शहरात अनेक प्रकल्प सुरू करण्यात आले. जसे, मेलबर्न म्युझियम Melbourne Museum, फेडरेशन स्क्वेयर Federation Square, क्राउन कॅसिनो Crown Casino, व सिटी लिंक या नावाचा द्रुतगती मार्ग.

सद्य स्थिती

कोबर्ग नामक उपनगरात मुन्रो स्ट्रीट येथे मेलबर्न येथील भारताच्या राजदूतांचे संपर्क कार्यालय ही आहे.

बि. एच. पी. बिलिटन या महाकाय खनिज उत्खनन संस्थेचे मुख्य कार्यालय येथे आहे. महाराष्ट्र मंडळ येथे कार्यरत आहे. या मंडळाचे संकेतस्थळ येथे पहा. महाराष्ट्र मंडळ व्हिक्टोरिया Archived 2007-12-31 at the Wayback Machine.

बाह्य दुवे