Jump to content

मेरी विग्मान

मेरी विग्मान (१३ नोव्हेंबर, १८८६:हॅनोव्हर - १८ सप्टेंबर, १९७३) या जर्मन नर्तकी, नृत्यशिक्षिका व नृत्यलेखिका होत्या. एमिल झाक् डॅलक्रॉझ व रूडाल्फ व्हॉन लेबन यांच्याकडे तिने नृत्याचे शिक्षण घेतले.१९१० मध्ये तिने आपला पहिला जाहीर नृत्यप्रयोग सादर केला.त्यानंतर १९१४ मध्ये लेबनची साहाय्यक म्हणून काही काळ त्यांनी त्यांच्या झुरिकमधील नृत्यविद्यालयात अध्यापन केले. स्वित्झर्लंडमध्ये तिने आपल्या स्वतंत्र नृत्यरचना बांधण्यास सुरुवात केली.१९२० साली त्यांनी ड्रेस्डेनमध्ये विग्‌मान सेंट्रल इन्स्टिट्यूट या आपल्या नृत्य शिक्षणसंस्थेची स्थापना केली.