Jump to content

मेरी रॉय

मेरी रॉय या एक भारतीय शिक्षणतज्ज्ञ आणि महिला हक्क कार्यकर्त्या आहेत. त्यांना १९८६ मध्ये सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या केराली सीरियन ख्रिश्चन समुदायाच्या वारसा कायद्याविरोधात खटला जिंकण्यासाठी ओळखल्या जातात. यानुसार सीरियन ख्रिश्चन महिलांना त्यांच्या पुरुष भावंडांसह त्यांच्या वडिलोपार्जित मालमत्तेत समान अधिकार सुनिश्चित करण्यात आला.[][] तोपर्यंत त्यांच्या सीरियन ख्रिश्चन समाजाने १९१६ च्या त्रावणकोर उत्तराधिकार कायदा आणि कोचीन उत्तराधिकार कायदा, १९२१ च्या तरतुदींचे पालन करण्यात येत होते. तर भारतात इतरत्र तोच समुदाय १९२५ च्या भारतीय उत्तराधिकार कायद्याचे पालन करत होता.[]

स.न. १९१६ च्या त्रावणकोर उत्तराधिकार कायद्यानुसार मेरी रॉयला कौटुंबिक मालमत्तेचा हिस्सा नाकारण्यात आला. त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी तिच्या भावांवर खटला भरला.[] या प्रकरणानेच भारतीय न्यायालयीन व्यवस्थेतून मार्ग काढला आणि त्या जिंकल्या.

त्या पल्लिकूदाम शाळेच्या (पूर्वी कॉर्पस क्रिस्टी हायस्कूल) संस्थापक संचालक आहेत. ही शाळा कलाथिलपाडी येथे आहे. हे एक कोट्टायम शहरातील एक उपनगर आहे. हे शहर केरळ राज्यात आहे . तिची मुलगी मॅन बुकर पुरस्कार विजेत्या अरुंधती रॉय आहेत.[]

न्यायालयीन खटला

स.न.१९१६ च्या त्रावणकोर उत्तराधिकार कायद्यामुळे मेरी रॉय यांना सीरियन ख्रिश्चन समुदायाच्या स्त्रियांना मालमत्ता मिळू शकली नाही. यासंदर्भात मेरी रॉयने तिचा भाऊ जॉर्ज इसहाक याच्याविरुद्ध १९६० मध्ये त्यांचे वडील पीव्ही इसहाक यांच्या निधनानंतर खटला दाखल भरला. त्यांनी त्यांच्या भावाला मिळालेल्या वारसामध्ये समान वाटा देण्यासाठी दावा केला. कनिष्ठ न्यायालयाने सुरुवातीला त्यांची याचिका फेटाळली. मालमत्ता दोन भागात विभागलेली होती - कोट्टायम मालमत्ता जी दोन लोकलमध्ये पसरली होती आणि दुसरा भाग नट्टाकोम ग्रामपंचायतीमध्ये होता. सीरियन ख्रिश्चन महिलांसाठी समान मालमत्तेच्या हक्कांसाठी लढा दिल्यामुळे हे प्रकरण एक महत्त्वपूर्ण प्रकरण मानले गेले.

मेरी रॉयने १९९४ मध्ये केरळ उच्च न्यायालयात धाव घेतली आणि कनिष्ठ न्यायालयाचा निकाल रद्द केला. त्या यशस्वी झाल्या. स.न.२००० मध्ये त्यांच्या आईच्या मृत्यूनंतर, त्यांनी अंतिम फर्मानासाठी कोट्टायम उप-न्यायालयात धाव घेतली. हे प्रकरण ८ वर्षे चालू राहिले त्यानंतर त्यानी २००९ मध्ये अंमलबजावणीची याचिका दाखल केली आणि त्यानंतर त्यांना मालमत्ता मिळाली.[]

वैयक्तिक जीवन

मेरी रॉय पीव्ही इसहाक यांची मुलगी होती. ते एक कीटकशास्त्रज्ञ होते. त्यांनी इंग्लंडमध्ये हॅरोल्ड मॅक्सवेल-लेफ्रॉय यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षण घेतले आणि पुसा येथे शाही कीटकशास्त्रज्ञ बनले.[] टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका वैयक्तिक मुलाखतीत मेरी यांनी त्यांच्या आयुष्याविषयीचे वैयक्तिक तपशील उघड केले. त्यांनी त्यांचा मोठा भाऊ जॉर्ज याच्याशी गुंतागुंतीचे संबंध असल्याचे कबूल केले. याच भावावर त्यांनी खटला भरला. त्यांनी पतीपासून विभक्त होण्याचा उल्लेखही केला होता.

अरुंधती रॉय यांनी लिहिलेल्या द गॉड ऑफ स्मॉल थिंग्जमध्ये अम्मू हे पात्र आहे जे तिची आई मेरी रॉयवर आधारित होते. मेरीने पुष्टी केली की ती त्यांच्या मुलीने लिहिलेल्या पात्रासारखीच आहे. परंतु त्यांचा कधीही खालच्या जातीच्या माणसाशी संबध नव्हते, असे पुस्तकात लिहिलेले होते. मुलाखतीत त्यांनी तपशील दिला की अरुंधतीने त्यांच्या आईपासून स्वातंत्र्य घोषित केले आणि दोघांचे त्या विशिष्ट काळासाठी संबंध बिघडले होते. तथापि, त्यांना अरुंधतीच्या कर्तृत्वाचा अभिमान आहे आणि त्यांना मॅन बुकर पुरस्कार जिंकण्याची अपेक्षा नव्हती.[]

संदर्भ

  1. ^ George Iype. "Ammu may have some similarities to me, but she is not Mary Roy". rediff. 12 May 2013 रोजी पाहिले.
  2. ^ George Jacob (29 May 2006). "Bank seeks possession of property in Mary Roy case". The Hindu. 31 May 2006 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 12 May 2013 रोजी पाहिले.
  3. ^ Jacob, George (2010-10-20). "Final decree in Mary Roy case executed". The Hindu. 21 October 2010 रोजी पाहिले.
  4. ^ a b "മേരി റോയി ജ്യേഷ്ഠനോട് പറഞ്ഞു: 'എടുത്തുകൊള്ളുക'". Mathrubhumi. 2018-05-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 20 May 2018 रोजी पाहिले.
  5. ^ Jacob, George; Jacob, George (2010-10-21). "Final decree in Mary Roy case executed". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2017-12-16 रोजी पाहिले.
  6. ^ Roy, Mary (1999). "Three generations of women". Indian Journal of Gender Studies. 6 (2): 203–219. doi:10.1177/097152159900600204. PMID 12322348.
  7. ^ "There's something about Mary - Times of India". The Times of India. 2017-12-16 रोजी पाहिले.

 

बाह्य दुवे