मेयर राधाकृष्णन मैदान हे भारताच्या चेन्नई शहरातील हॉकी मैदान आहे. या मैदानाला एम. राधाकृष्णन पिल्लै यांचे नाव दिलेले आह. या मैदानावर १९९६ आणि २००५ च्या चॅंपियन्स चषक स्पर्धा खेळल्या गेल्या. चेन्नई हॉकी असोसिएशनचे विभागीय सामने या मैदानावर खेळले जातात.