Jump to content

मेथांबा


मेथांबा

साहित्य :  १ वाटी कैरीच्या फोडी ,  १/२ वाटी गूळ ,  फोडणीसाठी -- तेल ,मोहरी ,जीरं ,हिंग ,हळद , २चमचे तिखट ,  पाव चमचा मेथीदाणे , चवीप्रमाणे मीठ

कृती : प्रथम कैरी धुऊन सालं काढावी .कैरीच्या लहान फोडी कराव्या .कढईत तेल ,मोहरी जीरं घालावं .मोहरी तडतडल्यावर मेथीदाणे घालावे .ते लालसर झाल्यावर हिंग ,हळद तिखट व कैरीच्या फोडी घालाव्या .  त्यावर थोडं पाणी शिंपडावं व झाकण घालून वाफ काढावी .नंतर मीठ व गूळ घालून थोडं शिजवावं .मेथांबा तयार .हा पोळी किंवा भाकरी बरोबर खायला छान लागतो .