मेण
मेण हे वितळल्यास तेलासारखे चिकट, मऊ, घनरूप, दाब दिला असता दबणारा व द्यावा तो आकार घेणारा, कमी ४५ अंश, तापमानास द्रवरूप होणारा, पाण्याचा प्रतिकार करणारा आणि ज्याचा पृष्ठभाग घासल्याने चमकतो असा पदार्थ होय.
प्रकार
नैसार्गिक मेण म्हणजेच झाडापासून, मधमाश्यांनी तयार केलेलं मेण, आणि शेलॅक मेण हे होत. शेलॅक मेण लाखेचा कीटक तयार करतो. मेणाच्या प्रकारात नैसार्गिक आणि कृत्रिम म्हणजेच पेट्रोलियम बेस असे दोन प्रकार असतात. पेट्रोलियम मेण हायड्रोकार्बन पासून बनलेले असते. यास काहीवेळा पॅंराफिन मेण असे ही म्हणतात.
वनस्पती मेण
प्राणीज मेण
वापर
सफरचंदावर वर निसर्गत:च मेणाचं आवरण असते. फळातील बाष्प निघून जाऊन ती शुष्क होऊ नयेत यासाठी निसर्गत:च ही योजना केलेली असते. पुर्वी छत्रीला मेण लावत असत. मेण हे ज्वालाग्राही असल्याने ते वितळवताना खूप काळजी घ्यावी लागते. मेणबत्तीचा वापर काळजीपुर्वक करावा लागतो. तसेच शिवणाचा दोरा मेण लावलेला असे. यामुळे तो सुई मध्ये ओवणे सोपे होते.